छत्रपती संभाजीनगर

परभणीत पदवीधर मतदारसंघासाठी मतदार मदत कक्ष कार्यान्वित

CD
पदवीधर मतदारसंघासाठी मतदार मदत कक्ष कार्यान्वित -------------- टोल फ्री १०७७, दूरध्वनी ०२४५२-२२६४०० उपलब्ध सकाळ वृत्तसेवा परभणी, ता. ८ : भारत निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या छत्रपती संभाजीनगर विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना आवश्यक माहिती, मार्गदर्शन, मदत उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात मतदार मदत कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत हा कक्ष कार्यरत राहणार असल्याची माहिती मदत कक्षप्रमुख तथा जिल्हा नियोजन अधिकारी उमेश वाघमारे यांनी दिली. या निवडणुकीसाठी शुक्रवार (ता. २३) रोजी मतदान तर मंगळवार (ता. २७) रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणूक प्रक्रियेसंदर्भातील माहिती व मार्गदर्शन देण्याबरोबरच मतदारांच्या तक्रारी, संदेशांची नोंद घेऊन त्यावर तातडीने कार्यवाही करण्याचे काम या कक्षामार्फत केले जाणार आहे. मतदारांना मदत कक्षाशी संपर्क साधण्यासाठी टोल फ्री क्रमांक १०७७ , (०२४५२-२२६४००) हा दूरध्वनी क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे. २ ते ३१ ऑक्टोबरदरम्यान १०५ अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती मदत कक्षाच्या कामकाजासाठी करण्यात आली आहे. यामध्ये जिल्हा नियोजन समिती, परभणी येथील दोन सांख्यिकी सहायक आणि एका महसूल सहायकाची कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी १० ते रात्री ९.४५ पर्यंत नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच १०२ ग्रामपंचायत अधिकाऱ्यांची निर्धारित वेळापत्रकानुसार सकाळी १० ते रात्री ८ पर्यंत मदत कक्षात उपस्थिती राहणार आहे. दूरध्वनीवरून प्राप्त होणाऱ्या सर्व संदेश व विचारणांची तातडीने नोंदवहीत नोंद केली जाणार असून, मदत कक्षाला भेट देणाऱ्या नागरिकांचीही नोंद ठेवण्यात येणार आहे. प्राप्त संदेशांची माहिती वेळोवेळी मदत कक्षप्रमुख तथा जिल्हा नियोजन अधिकारी उमेश वाघमारे यांना देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नियुक्त अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सोपविण्यात आलेली जबाबदारी दक्षतेने पार पाडावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. निवडणूक काळात कामकाजात कुचराई, निष्काळजीपणा किंवा आदेशाचे उल्लंघन झाल्यास लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५१ मधील कलम १३४ तसेच महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ मधील तरतुदींनुसार कारवाई करण्यात येणार असल्याचेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. ------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nana Patekar Death : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे Cardiac Arrest ने निधन; हार्ट अटॅक आणि कार्डियाक अरेस्टमध्ये काय फरक असतो? शरीरात नेमकं काय घडतं?

'या' लोकांपासून वेळीच दूर राहा! चाणक्य नीतीत सांगितले आहेत वाईट काळाचे संकेत

Mulund Fire: मुलुंडमध्ये बांधकाम साइटवर मोठा स्फोट, आगीचा भडका, परिसरात धुराचे लोट; Video Viral

Latest Marathi News Live Update: पुण्यात अतिक्रमण निरीक्षकाला लाथ मारून मारहाण

काँग्रेस कार्यकर्त्यांनी मला मारलं, मी मोदी समर्थक; काश्मिरी मुस्लीम तरुणाचा आरोप, दिल्लीत काय घडलं?

SCROLL FOR NEXT