छत्रपती संभाजीनगर

मतदारांनी त्यांचे दावे-हरकती १२ ऑक्टोबरपर्यंत दाखल करावेत

CD
‘मतदारांनी त्यांचे दावे-हरकती सोमवारपर्यंत दाखल करावेत’ सकाळ वृत्तसेवा परभणी, ता. ९ ः भारत निवडणूक आयोगाने १ ऑक्टोबर या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम अंतर्गत दावे व हरकती दाखल करणे तसेच त्यांचा निपटारा करण्यासाठी सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार आता दावे व हरकती सोमवारपर्यंत (ता.१२) दाखल करता येणार आहेत. जिंतूर विधानसभा मतदारसंघांतर्गत सेलू तालुक्यातील सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांना माहिती देण्यात आली आहे. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर एसआयआर संदर्भातील सुधारित वेळापत्रक, दावे-हरकती आणि मतदार सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. नोटीस कालावधी तसेच दावे व हरकतींचा निपटारा करण्याची प्रक्रिया १० नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानंतर अंतिम मतदार यादी १६ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. विशेष सखोल पुनरीक्षण ही मतदार, राजकीय पक्ष, निवडणूक यंत्रणा यांच्या सहभागातून राबविण्यात येणारी प्रक्रिया असून, या प्रक्रियेत पात्र नागरिकांनी मतदार यादीतील आपली नोंद तपासणे तसेच आवश्यक असल्यास नाव नोंदणी, दुरुस्ती किंवा संबंधित दावे-हरकती दाखल करणे अपेक्षित आहे. भारत निवडणूक आयोगाच्या मतदार सेवा पोर्टलवर नवीन मतदार नोंदणी, मतदार यादीतील तपशील अद्ययावत करण्याच्या सुविधा उपलब्ध आहेत. सुधारित वेळापत्रकाची माहिती जिंतूर विधानसभा मतदारसंघातील सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्ष, स्थानिक वृत्तपत्रे, प्रसारमाध्यमे, सोशल मीडिया माध्यमांद्वारे व्यापक स्वरूपात प्रसारित करण्यात येत आहे. जास्तीत-जास्त पात्र नागरिकांनी मतदार यादीशी संबंधित नोंदणी, दुरुस्ती तसेच दावे-हरकती प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन सहायक मतदार नोंदणी अधिकारी डॉ. शिवाजी मगर यांनी केले आहे. -------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारतीय वंशाच्या नवी पिल्लई यांना यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार; आंतरराष्ट्रीय कायदा अन् मानवाधिकारांसाठी मोठं काम

Family Pension Rules: सुनेच्या पेन्शनमध्ये सासूला हिस्सा मिळतो का? नातवंडांकडून पैसे मागता येतात? हायकोर्टाने काय सांगितलं?

जसप्रीत बुमराह RCB मध्ये? MI च्या माजी खेळाडूचा गौप्यस्फोट, तेव्हा IPL फ्रँचायझी म्हणाली, 'ये बुमराह-वुमराह क्या करेगा?'

Maharashtra Drought News : राज्यातील आणखी १८ तालुक्यात दुष्काळ?, पिकांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश; सांगली जिल्ह्यातील दोन तालुक्यांचा समावेश

IND vs WI 2nd T20I: अभिषेक शर्माला जगात भारी बनण्याची संधी; सूर्यकुमारचा वर्ल्ड रेकॉर्ड निशाण्यावर, बाबरचाही विक्रम करणार उद्ध्वस्त

SCROLL FOR NEXT