sambhaji nagar  sakal
छत्रपती संभाजीनगर

RTE Admission : आरटीईचे यंदाही रडगाणेच; जानेवारी सरत आला तरीही नवीन शैक्षणिक वर्षासाठी प्रतीक्षा

साधारणपणे नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यातच प्रारंभ होणारी आरटीई प्रवेश प्रक्रिया यंदा जानेवारी महिना संपला तरी सुरू झाली नाही. त्यामुळे शासनाला आरटीई प्रवेश प्रक्रियेचा विसर पडला की काय? असा प्रश्न पडला आहे; तसेच इंग्रजी शाळांची प्रतिपूर्ती मिळाली नसल्याने त्यांचेही आरटीई प्रक्रियेबाबत तोंडावर बोट आहे.

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : साधारणपणे नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यातच प्रारंभ होणारी आरटीई प्रवेश प्रक्रिया यंदा जानेवारी महिना संपला तरी सुरू झाली नाही. त्यामुळे शासनाला आरटीई प्रवेश प्रक्रियेचा विसर पडला की काय? असा प्रश्न पडला आहे; तसेच इंग्रजी शाळांची प्रतिपूर्ती मिळाली नसल्याने त्यांचेही आरटीई प्रक्रियेबाबत तोंडावर बोट आहे.

मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ मधील कलम १२(१), (सी) नुसार दुर्बल व वंचित घटकातील बालकांसाठी खासगी विना अनुदानित, खासगी कायम विना अनुदानित व स्वयं अर्थसहाय्यित शाळांमध्ये किमान २५ टक्के प्रवेश राखीव ठेवण्याची तरतूद आहे.

जिल्ह्यातील हजारो पालक आरटीई प्रवेश प्रक्रियेची वाट पाहत आहेत. जिल्ह्यातील आरटीई पात्र सुमारे ५५० शाळांमध्ये आरटीईच्या सुमारे १० हजारांहून अधिक जागांसाठी तब्बल २० ते २५ हजार विद्यार्थी अर्ज करतात. यंदा शालेय शिक्षण विभागाने आरटीई प्रवेश प्रक्रियेसंदर्भात राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठवला आहे. परंतु, अद्याप शासनाकडून त्यास मान्यता दिली नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

इंग्रजी शाळा उदासीन

शासनाकडून आरटीईच्या विद्यार्थ्यांची शुल्क प्रतिपूर्तीची रक्कम इंग्रजी शाळांना वेळेवर दिली जात नाही. त्यामुळे दरवर्षी शिक्षण विभाग व इंग्रजी शाळामध्ये प्रतिपूर्तीसाठी संघर्ष होतो. जोपर्यंत शुल्क प्रतिपूर्तीची रक्कम मिळत नाही, तोपर्यंत आरटीईच्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार नाही, अशी भूमिका शाळांकडून घेतली जाते. परंतु, यंदा शासनाने आरटीईबाबत अद्याप कोणताच निर्णय घेतला नाही. त्यामुळे खासगी इंग्रजी शाळांनी आरटीईबाबत तोंडावर बोट ठेवले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT