छत्रपती संभाजीनगर

जलसंधारणासाठी लोकचळवळ उभारा

CD
जलसंधारणासाठी श्रमदानाची लोकचळवळ उभी करा : कर्डिले ----- नांदेड, ता. ६ : दुष्काळ आणि पाणीटंचाईवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी जलसंधारणाची कामे लोकसहभागातून हाती घेऊन श्रमदानाची व्यापक लोकचळवळ उभी करावी. प्रशासनाने केवळ नियोजनापुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष कृतीतून गावांचा विकास साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले. अर्धापूर तालुक्यातील डौर येथील नंदीग्राम पर्यटन केंद्रात जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाच्या वतीने मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान २.० कार्यशाळा आणि जिल्हास्तरीय दुष्काळ व पाणीटंचाई आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी कर्डिले म्हणाले, माती-नाला बांध, जलसंधारण आणि पाणलोट विकासाची कामे नियोजनबद्ध पद्धतीने राबवावीत. गावांमध्ये लोकसहभाग वाढवून श्रमदानाला प्रोत्साहन द्यावे. चांगले काम करणाऱ्या गावांमध्ये मी स्वतः, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि वरिष्ठ अधिकारी श्रमदानात सहभागी होणार आहोत. आठवड्यातून किमान दोन ठिकाणी भेट देण्याचा प्रयत्न राहील. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान हा केवळ शासकीय उपक्रम न राहता लोकचळवळ बनावा. गावविकास, जलसंधारण, रोजगारनिर्मिती आणि सामाजिक परिवर्तनासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांनी पुढाकार घ्यावा. या कामांसाठी प्रशासन खंबीरपणे पाठीशी राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ACB Action: मोफत कायदेशीर मदतीच्या नावाखाली लाचखोरी! वकील ताब्यात, पत्नीविरोधातही गुन्हा; एसीबीने रंगेहाथ पकडलं

Maharashtra Village Diwali Bonus: महाराष्ट्रातील 'या' गावाची कमाल! गावकऱ्यांना दिला दिवाळी बोनस; विकासाच्या जोरावर देशभर डंका

Lavrov Deepfake: बनावट व्हिडिओमुळे प्रशांत भूषण अडचणीत; दिल्ली पोलिसांनी दाखल केली FIR

ना हिरो, ना खलनायक; महेश कोठारेंच्या 'माझा छकुला' मध्ये हमाल म्हणून दिसलेले सचिन गोस्वामी; कशी मिळालेली भूमिका? म्हणाले-

Pune Crime: पुण्यात व्यावसायिकावर गोळीबार करून २२ तोळ्यांचे सोने लुटले; उत्तर प्रदेशातील टोळीला मकोका

SCROLL FOR NEXT