छत्रपती संभाजीनगर

जलसंधारणाची लोकचळवळ गावागावांत पोहोचवा

CD
जलसमृद्ध भविष्य घडविण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करावेत ----------- -पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांचे आवाहन सकाळ वृत्तसेवा परभणी, ता. १ ः जलसंधारणाची लोकचळवळ अधिक व्यापक करून पाणीदार आणि जलसमृद्ध भविष्य घडविण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करावेत, असे आवाहन पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी शुक्रवारी (ता. ३०) केले. पावसाचे पाणी जमिनीत मुरवून भूजल पातळी वाढविण्याच्या उद्देशाने पाथरी तालुक्यातील नाथरा येथे जलतारा शोषखड्डा तयार करण्यात आला आहे. या शोषखड्ड्याचे उद्‍घाटन (ता. ३०) पालकमंत्री बोर्डीकर यांच्या हस्ते करण्यात आले. यानिमित्त येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पालकमंत्री बोर्डीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत जलतारा शोषखड्ड्याचे प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले होते. भाजप किसान मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष भागवत वाकणकर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी पालकमंत्री बोर्डीकर म्हणाल्या की, नाथरा येथे जलतारा शोषखड्डा तयार करण्यात आला, ही निश्‍चितच आनंदाची बाब आहे. पावसाचे पाणी जमिनीत मुरवून भूजल पातळी वाढविण्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम गावागावांत राबविणे गरजेचे आहे. जलसंधारणाची ही लोकचळवळ अधिक व्यापक करून पाणीदार आणि जलसमृद्ध भविष्य घडविण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले. जलसंधारणाच्या दृष्टीने जलतारा शोषखड्ड्यासारखे उपक्रम ग्रामीण भागात राबविल्यास पावसाच्या पाण्याचा प्रभावी विनियोग होण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे गावपातळीवर लोकसहभागातून अशा उपक्रमांना प्रोत्साहन देण्याची गरज यावेळी व्यक्त करण्यात आली. ------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मतांसाठी उमेदवारांची भन्नाट ऑफर! कुठे २,५०० रुपये, तर कुठे चक्क एक किलो चिकन फ्री; मतदानाच्या दिवशी लोकशाहीचे धिंडवडे!

RINKU SINGH: ठरलं तर मग! रिंकू सिंहच्या लग्नाची तारीख पक्की, बहीण नेहा सिंहने दिली मोठी अपडेट; शॉपिंगही झाली सुरू, जाणून घ्या सविस्तर

बांदेकरांच्या सुनेची झी मराठीच्या नव्या मालिकेत एन्ट्री! हर्षद अतकरी साकारणार 'अभ्या', तारीख आणि वेळ जाहीर

IND vs NZ, 5th T20I: सिफर्टच्या ९३ धावा अन् फिलिप्सने मोडला विलियम्सनचा रेकॉर्ड; न्यूझीलंडने मॅच जिंकली, पण मालिका भारताच्या खिशात

थंडीच्या दिवसांत ओठ फुटतात, कोरडे पडतात? पारिजातकाच्या फुलांपासून बनवा नॅचरल लिप बाम; ओठ राहतील मऊ!

SCROLL FOR NEXT