छत्रपती संभाजीनगर

हि बातमी पेंडिंग होती परत पाठवलीय

CD
पाण्याअभावी घरकुलाचे स्वप्न दूर तालुक्यात मंजूर असलेल्या २१ हजार ८०० घरकुलांचे काम लांबणार राम काळगे निलंगा, ता. ३१ : निलंगा तालुक्यामध्ये विविध योजनेअंतर्गत जवळपास २१ हजार ८०० घरकुले मंजूर झाले असले तरी त्यातील सुरू झालेल्या साडेआठ हजार घरकुलाचे बांधकाम पाण्याअभावी धोक्यात आले आहे. शहरासह ग्रामीण भागात पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालल्याने घरकुलाचे बांधकाम आता लाभार्थ्यांना बंद ठेवावे लागणार आहेत. तालुक्यातील पात्र लाभार्थ्याला प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत गरिबांचे घरकुलाचे स्वप्न पूर्ण होणार असले तरी बाजारातील साहित्याचे वाढलेले दर पाहता देण्यात येणाऱ्या रक्कमेत घरकुल पूर्ण होईल का? असा प्रश्न लाभार्थ्यांना पडला आहे. राज्य व केंद्र शासनाकडून ग्रामीण भागातील गरजू लाभार्थ्यांना वेगवेगळ्या योजनेमध्ये घरकुल मंजूर केले जाते. त्यामध्ये रमाई आवास योजना, मोदी आवास योजना, प्रधानमंत्री आवास योजना, शबरी आवास योजना, अहिल्यादेवी होळकर आवास योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना अशा वेगवेगळ्या माध्यमातून घरकुलाची मंजुरी दिली जाते. निलंगा तालुक्याचे कार्यक्षेत्र मोठे असून ग्रामपंचायत व गावाची संख्या अधिक आहे त्यामुळे तालुक्यात घरकुलाचे लाभार्थीही मोठ्या प्रमाणात आहे. सध्या दुष्काळी परस्थिती गंभीर बनली असून गावात पाण्याचे स्रोत कमी होत चालले आहेत. पाणी राखून ठेवण्यासाठी प्रशासनाकडून थेट कारवाया केल्या जात आहेत. शेती ऐवजी पिण्याला पाणी राखीव ठेवले जात आहेत. पाण्याची समस्या निर्माण झाल्याने सुरू असलेले साडेआठ हजार घरकुल बांधकाम प्रश्न निर्माण झाला आहे. ही बांधकामे बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. तालुक्यात विविध योजनेतून २१ हजार ८३७ घरकुले मंजूर आहेत त्यापैकी ८ हजार ५०० घरकुले सुरू असून त्यातील काही कामांचा पहिला हप्ता पडला आहे तर काही घरकुलांना दुसरा हप्ता टाकण्यात आला आहे. त्यामुळे सुरू झालेले घरकुल बांधकामावर दुष्काळामुळे गंडातर आले आहे. ......... मतदारसंघातील स्थिती निलंगा विधानसभा मतदारसंघातील निलंगा, देवणी व शिरूर अनंतपाळ या तीन तालुक्यांसाठी सन २०२५-२६ या वर्षासाठी तब्बल २८ हजार ४२२ घरकुल मंजुर झाले आहेत. त्यामध्ये निलंगा तालुक्यात १५ हजार ८७८, शिरूर अनंतपाळ तालुका ६ हजार ५०७ तर देवणी तालुक्यात: ६ हजार ३७ घरकुले मंजूर आहेत. यातील काही घरकुलाची मंजूरी यापूर्वीच देण्यात आली आहे. .......

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: पुनर्रोपणासाठी मुंबईत जागा आहे कुठे? पर्यावरणप्रेमींचा सवाल; पाच महिन्यांत ७,६३३ झाडे हटवण्यास परवानगी

Mumbai Metro 4: स्वयंचलित पहिली मेट्रो सज्ज! दिवाळीनंतर मुंबईत दाखल होणार; कसा असेल प्रवास? पाहा वैशिष्ट्ये

Marathi News Live Updates : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर मंदिरात विधिवत पूजा; राज्यपाल व मुख्यमंत्र्यांसह दिग्गजांची उपस्थिती

स्टार प्रवाहच्या नायकाची झी मराठीवर एंट्री; झळकणार नव्या कार्यक्रमात, ओळखलंत का ठकुबाईच्या नातवाला?

Pune News : पुण्यातील महाविद्यालयात व्यसनमुक्ती अभियान; पोस्टर आणि घोषवाक्यांतून विद्यार्थ्यांची जनजागृती

SCROLL FOR NEXT