Rain Update Sakal
छत्रपती संभाजीनगर

धरण उशाला कोरड घशाला! जायकवाडीच्या पायथ्याच्या गावात भरपावसाळ्यात टँकरने पाणीपुरवठा|Water Crisis

दत्ता लवांडे

Chhatrapati Sambhaji Nagar News: महाराष्ट्रातील अनेक भागांत पावसाने दडी मारल्यामुळे दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. भर पावसाळ्यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण येथे जायकवाडी धरणाच्या पायथ्यालगत असलेल्या गावातच टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

पैठण तालुक्यातील १६ गावे आणि ४ वाड्या असे मिळून साधारण ४५ हजार नागरिकांना १९ टँकरने पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. आडुळ बु., आडुळ खुर्द, ब्राम्हणगाव तांडा, अंतरवाली खांडी, गेवराई खुर्द, गेवराई बु., गेवराई मर्दा, दाभरूळ, एकतुनी रजापूर, पारूंडी तांडा, आडगाव जावळे, कडेठाण खुर्द, होनोबाची वाडी, पारूंडी कडेठाण बुद्रुक या गावात टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. या भागातील सगळे जलस्त्रोत आटले असून सर्वांना पावसाची प्रतीक्षा आहे. विशेष म्हणजे जायकवाडी धरणापासून ही सर्व गावे हाकेच्या अंतरावर आहेत.

धरणाच्या पायथ्यालगतच्या गावात ही स्थिती

पैठण पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागातर्फे हे १९ टँकरद्वारे या गावातील नागरिकांना पाणीपुरवठा करण्यात येतो. जायकवाडी हे आशिया खंडातील सर्वांत मोठे मातीचे धरण आहे. या धरणामुळे मराठवाड्यातील जवळपास अडीच लाख हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येते.

पण यावर्षी धरणाच्या पायथ्याला असलेल्या गावांत भर पावसाळ्यात अशा प्रकारची पाणीटंचाई आहे. ७ जून नंतर टँकर बंद करण्यात येतात पण यावर्षी ऑगस्टचा शेवटचा आठवडा आला तरी टँकर चालूच असल्यामुळे ही ही धोक्याची घंटा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Weather: मुंबईकर घामाने भिजणार! पुढील ३ दिवसात तापमानात मोठे बदल होणार; हवामान विभागाचा नवा अंदाज

Latest Marathi News Live Update : सेव्हन लव्ह चौकात दोन गटांत तूफान मारामारी

Female Judge Dowry FIR : महिला न्यायाधीशाचा ३० लाखांच्या हुंड्यासाठी छळ, इंजिनिअर पतीसह सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल

Gokul Election: गोकुळ’साठी आज चुरशीने मतदान, सहा बोटांना शाई शक्य

Ethanol Production,: साखरेपासून इथेनाॅल निर्मितीवर बंदी;मक्यापासून निर्मित इथेनाॅलच्या भावातही कपात

SCROLL FOR NEXT