छत्रपती संभाजीनगर

लोणी बु.सह पाच तांड्यांवर पाणीटंचाईचे संकट ! - आठ दिवसांत पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणी - १ नोव्हेंबरपासून आमरण उपोषणाचा इशारा

CD
लोणीसह पाच तांड्यांवर पाणीटंचाईचे संकट -------- आठ दिवसांत पुरवठा सुरू करण्याची मागणी; एक नोव्हेंबरपासून उपोषणाचा इशारा पाथरी,ता.१५ (बातमीदार) तालुक्यातील लोणीसह (बुद्रुक) चार तांडा वस्त्यांसाठी जलजीवन मिशनअंतर्गत पाणीपुरवठा योजना राबविण्यात आली असली तरी अद्याप ग्रामस्थांना या योजनेचे पाणी मिळत नसल्याने ग्रामस्थांना तीव्र पाणीटंचाई भेडसावत आहे. योजना उभारूनही नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे आठ दिवसांत पाणीपुरवठा सुरू करावा अन्यथा कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा शिवसेनेचे (उबाठा) जिल्हाप्रमुख रवींद्र धर्मे यांनी दिला आहे. शासनाने ग्रामीण भागातील नागरिकांना शुद्ध व मुबलक पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी जलजीवन मिशन योजना सुरू केली. त्यानुसार लोणी बुद्रुकसह शेजारील तांड्यावर नागरिकांना पाणीपुरवठा व्हावा या उद्देशाने योजनेचे काम हाती घेण्यात आले. योजनेसाठी आवश्यक संरचना उभारण्यात आली असली तरी प्रत्यक्ष पाणीपुरवठा सुरू नसल्याने योजनेचा लाभ ग्रामस्थांना मिळत नाही. यावेळी यासंदर्भात दिलेल्या निवेदनानुसार, तारुगव्हाण उच्च पातळी बंधाऱ्याजवळील विहिरीत साठा उपलब्ध असूनही ठेकेदाराच्या उदासीनतेमुळे काम रखडल्याचा आरोप करण्यात आला आहे. यापूर्वी दुष्काळी परिस्थितीत गावास टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ आली होती. त्या आठवणी आजही ग्रामस्थांच्या मनात ताज्या आहेत. आता पुन्हा पाणीटंचाईचे संकट गडद होत असताना जलजीवन योजनेचे काम पूर्ण होऊन पाणीपुरवठा सुरू न झाल्यास आगामी काळात नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो. गावात योजना उभारूनही पुन्हा टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ येऊ नये अशी ग्रामस्थांची अपेक्षा आहे. चौकट )) आठ दिवसांचा अल्टिमेटम जलजीवन योजनेचे उर्वरित काम तातडीने पूर्ण करून आठ दिवसांच्या आत पाणीपुरवठा सुरू करावा अशी मागणी शिवसेनेचे (उबाठा)जिल्हाप्रमुख रवींद्र धर्मे, माजी जि.प. सदस्य रणजित गिराम यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यकारी अभियंत्यांना बुधवारी (ता.१४) एका निवेदनाद्वारे केली. संबंधित ठेकेदाराला तातडीने काम पूर्ण करण्याचे आदेश द्यावेत अशीही मागणी करण्यात आली आहे. अन्यथा एक नोव्हेंबरपासून कार्यकारी अभियंता कार्यालयासमोर ग्रामस्थांतर्फे उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tulja Bhavani Temple : तुळजाभवानीच्या गाभाऱ्यात सोलापूरच्या 'मटका किंग'चं फोटोसेशन; व्हीआयपी दर्शनावरून उडाळी खळबळ, मंदिरातील अनागोंदी कारभाराविरोधात संताप

South Solapur News: गॅस सिलिंडरच्या स्फोटात घर जळून खाक; कोळी कुटुंबाच्या मदतीला धावले महादेव कोगनुरे

Latest Marathi News Update : ज्ञानेश कुमारांमुळे मोदी सत्तेत आले : अभिजीत दिपके

Pune Leopard News: सिंहगडाच्या पश्चिमेकडे बिबट्याची दहशत; तासाभरात तीन दुचाकीस्वारांवर हल्ले, युवती जखमी

Yunus Shaikh: कैसे हराया... फेम सहर शेखच्या वडिलांना शिंदेसेनेत मानाचं पान, युनूस खान यांची महत्त्वाच्या पदावर नियुक्ती

SCROLL FOR NEXT