छत्रपती संभाजीनगर

पंधरा गावांत पाणीबाणी १५ गावांना २३ टँकरद्वारे पाणीपुरवठा, ३७० विहिरी अधिग्रहित

CD
पंधरा गावांत पाणीबाणी २३ टँकरद्वारे पाणीपुरवठा, ३७० विहिरी अधिग्रहित सकाळ वृत्तसेवा धाराशिव, ता. ४ : जिल्ह्यात पाणीसाठा अत्यल्प उरल्याने पाणीटंचाईचे संकट दिवसेंदिवस बिकट होऊ लागले आहे. पिण्याच्या पाण्याच्या तीव्र टंचाईने डोके वर काढले असून ग्रामीण भागात पाण्याचे दुर्भिक्ष जाणवू लागले आहे. जिल्ह्यातील १५ गावांना २३ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. आगामी काळात टंचाईची ही स्थिती वाढतच जाणार असून पाणीटंचाईची भीषणता अधिक वाढण्याची स्पष्ट चिन्हे दिसत आहेत. ...... ............................. ((चौकट)) टंचाईचे चटके टंचाईचा घटक...सद्यःस्थिती...उपाययोजना टँकरग्रस्त गावे...१५ गावे (धाराशिव, लोहारा, उमरगा तालुका)...धाराशिव तालुक्यात सर्वाधिक झळ कार्यरत टँकर...१५ टँकर सुरू...नळाद्वारे पाणीपुरवठ्याची प्रतीक्षा लांबली अधिग्रहित विहिरी/बोअरवेल...३७० स्रोतांचे अधिग्रहण...महिनाभरात अधिग्रहित विहिरींची संख्या १८० वरून ३७० वर जलप्रकल्प स्थिती...पाणीसाठा तळाला...लघु व मध्यम प्रकल्पांत अपुरा पाणीसाठा; शेततळी कोरडी ...... ............................. ((चौकट)) धाराशिव तालुक्याला सर्वाधिक झळ जिल्ह्यात पाणीटंचाईची सर्वाधिक तीव्रता धाराशिव तालुक्यात पाहायला मिळत आहे. धाराशिव तालुक्यातील कौडगाव बावी, करजखेडा, बोरखेडा, पळसप, नांदुर्गा, वाणेवाडी, जवळे दुमाला, येडशी, काजळा, खामगाव या १० गावांत टँकरद्वारे पाणी पुरवले जात आहे. तर लोहारा तालुक्यातील सास्तूर येथेही एक टँकर सुरू आहे. तसेच उमरगा तालुक्यातील नारंगवाडी, बलसूर, आनंदनगर, पेठसांगवी चार गावांत टॅंकरने पाणी पुरविले जात आहे. ज्या गावांमध्ये आधी ४ ते ५ दिवसांआड पाणी येत होते, तिथे आता नागरिकांना ८ ते १० दिवस प्रतीक्षा करावी लागत आहे. ...... ............................. ((चौकट)) राखीव पाणीसाठ्यासाठी गस्ती पथके आवश्यक टंचाईचे संकट दिवसेंदिवस अधिक तीव्र आणि भीषण होऊ लागली आहे. विहिरी आटल्या असून बोअरवेलनेही तळ गाठला आहे. पुढील सात महिने जिल्ह्यासाठी अत्यंत कठीण ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रकल्पांतील उपलब्ध ५ टक्के उपयुक्त पाणीसाठा केवळ पिण्यासाठी राखीव ठेवलेला असला, तरी पाण्याचा अनधिकृत उपसा रोखण्याचे प्रशासनासमोर मोठे आव्हान आहे. गस्ती पथके तैनात केलेली असली तरी रात्री होणारा पाण्याचा अवैध उपसा रोखणे गरजचे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asaduddin Owaisi: 'एका अब्दुलने मिशीगन जिंकले; आता दुसऱ्याने यूपीत कमाल करून दाखवावी!' ओवैसींना म्हणायचेय काय?

MSRTC strike Diwali: ऐन दिवाळीत 'एसटी'चा संप! कर्मचाऱ्यांनी दिली राज्यव्यापी आंदोलनाची हाक

Pune Bengaluru Highway: पुणे-बंगळूर महामार्गावर वाहतुकीचा खोळंबा! किनीतील आंदोलनामुळे कोगनोळीत ट्रकच्या लांबच लांब रांगा

Latest Marathi News Live Update : ज्ञानेश कुमार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

कोणाकडे तरी आकर्षित होऊन... वयाच्या ६० व्या वर्षी आशिष विद्यार्थी यांनी का केलं दुसरं लग्न? आता सांगितलं कारण, म्हणाले-

SCROLL FOR NEXT