प्रकल्पांत सहा टक्के पाणीसाठा
नऊ गावांना १२ टँकर; १३१ गावांची तहान भागविण्यासाठी २७७ विहिरी अधिग्रहित
धाराशिव, ता. १५ (बातमीदार) : पावसाने ओढ दिल्याने जिल्ह्यातील पाणीटंचाईचे संकट अधिक गडद झाले आहे. जिल्ह्यातील २२५ लघू-मध्यम प्रकल्पांमध्ये मिळून केवळ सहा टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाला टँकर आणि खासगी विहिरींच्या अधिग्रहणाचा आधार घ्यावा लागत आहे. सध्या नऊ गावांना १२ टँकरद्वारे, तर १३१ गावांना २७७ खासगी विहिरी व कूपनलिकांच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात आहे.
जिल्ह्यात एक मोठा, १७ मध्यम आणि २०७ लघुप्रकल्प आहेत. पावसाअभावी या प्रकल्पांतील पाणीसाठ्यात अपेक्षित वाढ झालेली नाही. भूगर्भातील पाणीपातळीही खालावल्याने सार्वजनिक विहिरी आणि कूपनलिका कोरड्या पडत आहेत. टँकर भरण्यासाठी नऊ खासगी विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. धाराशिव तालुक्यातील पळसप, कौडगाव (बावी), करजखेडा, बोरखेडा आणि नांदुर्गा या गावांसह उमरगा तालुक्यातील नारंगवाडी, बलसूर, आनंदनगर आणि लोहारा तालुक्यातील सास्तूर येथे टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. यासाठी मंजूर २४ खेपांद्वारे पाणी वितरित केले जात आहे. आगामी काळात टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून असून, जुलै २०२७ पर्यंतचा पाणीटंचाई आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे.
...............
((चौकट))
उमरगा तालुक्यात सर्वाधिक विहिरी अधिग्रहित
जिल्ह्यातील १३१ गावांमध्ये पाणीटंचाईवर मात करण्यासाठी एकूण २७७ खासगी विहिरी व कूपनलिका अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. धाराशिव तालुक्यात ३३ गावांना ६१, तुळजापूर तालुक्यातील ३१ गावांना ६१, उमरगा तालुक्यातील २७ गावांना ७१, लोहारा तालुक्यातील २६ गावांना ५७ कळंब तालुक्यातील चार गावांना १२, वाशी तालुक्यातील ११ गावांना ११, परंडा तालुक्यातील १० गावांना १० विहिरींचे अधिग्रहण करून पाणीपुरवठा सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.