छत्रपती संभाजीनगर

येलदरीत ६०.३०, सिद्धेश्वरमध्ये २७.९१ टक्के जिवंत साठा

CD
येलदरीत ६०.३०, सिद्धेश्वरमध्ये २७.९१ टक्के साठा ------------- दोन्ही धरणे मिळून ८०५.७५५ दलघमी साठा; मुख्य दरवाजांतून विसर्ग बंद सकाळ वृत्तसेवा परभणी, ता. १९ : जिल्ह्यासह परिसरासाठी महत्त्वाच्या असलेल्या येलदरी, सिद्धेश्वर धरणांतील साठ्याची सद्यःस्थिती समोर आली आहे. सोमवारी (ता.१९) सकाळी सहा वाजता हाती आलेल्या आकडेवारीनुसार, येलदरी धरणात ६०.३० टक्के, तर सिद्धेश्वर धरणात २७.९१ टक्के जिवंत साठा शिल्लक आहे. दोन्ही धरणांतील एकूण साठा ८०५.४२५ दलघमी असून, सध्या दोन्ही धरणांतून मुख्य दरवाजांद्वारे पाण्याचा विसर्ग सुरू नाही. येलदरी धरणाची एकूण साठा क्षमता ९३४.४४० दलघमी असून त्यापैकी १२४.६७० दलघमी मृतसाठा, तर ४८८.२६९ दलघमी जिवंत साठा आहे. धरणातील एकूण साठा ६१२.९३९ दलघमी असून, पातळी ४५८.३२० मीटर नोंदविण्यात आली आहे. मागील २४ तासांत धरणात १२१.४८९ दलघमी आवक नोंदविण्यात आली आहे. यंदाच्या पावसाळ्यात आतापर्यंत ६०० मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून सोमवारी सकाळी पावसाची नोंद झाली नाही. दुसरीकडे, सिद्धेश्वर धरणाची एकूण क्षमता २५०.८५० दलघमी आहे. सध्या धरणात १६९.८९० दलघमी मृतसाठा आणि २२.५९६ दलघमी जिवंत साठा आहे. धरणातील एकूण साठा १९२.४८६ दलघमी असून, जिवंत पाणीसाठ्याची टक्केवारी २७.९१ आहे. धरणाची पातळी ४११.०९५ मीटर नोंदविण्यात आली आहे. मागील २४ तासांत धरणात ९३.७८६ दलघमी आवक नोंदविण्यात आली आहे. यंदा आतापर्यंत ६०५ मिलिमीटर पाऊस झाला असून, मागील वर्षी याच तारखेपर्यंत एक हजार मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. ((चौकट))) धरणांतील साठ्यावर आगामी नियोजन दोन्ही धरणांच्या पातळीवर आणि उपलब्ध साठ्यावर आगामी काळातील पाणी नियोजन अवलंबून राहणार आहे. सध्या येलदरी आणि सिद्धेश्वर या दोन्ही धरणांचे मुख्य दरवाजे बंद असून, विसर्ग शून्य क्युसेक आहे. …….………

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Election Result 2026 : एकटा बास! मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, ३ मंत्री, २ खासदार, १० आमदारांना पुरून उरले सतेज पाटील; वाचा विजयी उमेदवारांची फायनल यादी

Latest Marathi News Live Update : बंटी पाटलांचा महायुतीला दणका! गोकुळ दूध संघ निवडणुकीत समविचारी आघाडीची सत्ता स्थापनेकडे वाटचाल

Petrol Diesel Price: आंतरराष्ट्रीय बाजारात घसरण; भारतात पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार का?

त्याने स्वतःच स्वतःचा जीव घेतला... लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या निधनावर भाऊ पुरुषोत्तम बेर्डे यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले- कुणाचंही ऐकलं नाही...

Gokul Election Result 2026 : ब्रेकिंग न्यूज! नविद मुश्रीफ पराभूत; सतेज पाटलांची आघाडी १४ जागांवर आघाडी

SCROLL FOR NEXT