छत्रपती संभाजीनगर

जलजीवनची कामे मुदतीत न करणारे ठेकेदार होणार ''ब्लॅकलिस्ट''

CD
((मेन)) ................................. ‘जलजीवन’ची कामे वेळेत न झाल्यास ठेकेदार ‘ब्लॅकलिस्ट’ दिरंगाईमुळे टॅंकरने पाणी पुरवावे लागल्यास त्याचा खर्चही वसूल केला जाणार सकाळ वृत्तसेवा धाराशिव, ता. ७ : जलजीवन मिशनअंतर्गत मंजुरी मिळालेली कामे निर्धारित वेळेत आणि गुणवत्तेसह पूर्ण न करणाऱ्या निष्काळजी ठेकेदारांवर आता थेट काळ्या यादीत टाकण्याची कडक कारवाई केली जाणार आहे. एवढेच नाही, तर कामातील दिरंगाईमुळे एखाद्या गावात टँकरने पाणी देण्याची वेळ आल्यास, त्या टँकरचा संपूर्ण खर्च संबंधित कंत्राटदाराच्या खिशातून वसूल केला जाणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जलजीवन मिशनच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी निविदेतील अटी व शर्तींचे उल्लंघन करणाऱ्यांची कोणतीही गय न करता कठोर पावले उचलण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत. बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता, कनिष्ठ अभियंता आणि कंत्राटदार उपस्थित होते. ग्रामीण भागात पाण्याचा थेट संबंध नागरिकांच्या दैनंदिन जगण्याशी असतो. काम वेळेत पूर्ण न झाल्यामुळे जर गावात पाणीटंचाई निर्माण झाली आणि प्रशासनाला टँकर सुरू करावा लागला, तर त्याची सर्वस्वी जबाबदारी कंत्राटदाराची राहील. टँकरचा संपूर्ण खर्च ठेकेदाराच्या बिलातून वसूल करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय या बैठकीत घेण्यात आला. जलजीवन मिशनचा मूळ उद्देश प्रत्येक घराला नळाने सुरक्षित पाणी पुरवणे हा आहे. त्यामुळे तांत्रिक अडचणी दूर करून सर्व अपूर्ण कामे वेगाने पूर्ण करावीत आणि नागरिकांना दिलासा द्यावा, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित यंत्रणांना दिले आहेत. ................. ((चौकट)) २४८ कामे अजूनही रखडलेली जिल्ह्यात जलजीवन मिशनअंतर्गत एकूण ५९४ योजनांपैकी ३४६ कामे पूर्ण झाली असून, २४८ कामे अजूनही प्रगतिपथावर आहेत. अंतिम टप्प्यात आलेल्या कामांचा वेग वाढवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी मुदत दिली आहे. ९० ते १०० टक्के प्रगती झालेली २५ कामे येत्या ८ दिवसांत पूर्ण करून योजना कार्यान्वित करावी लागणार आहे. तर ८० ते ९० टक्के टप्प्यातील ४४ कामे महिनाभरात पूर्ण करावी लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Net Worth: राहुल गांधींकडे नेमकी संपत्ती किती? ऑफीस 'एवढ्या' कोटींचं! शेअर बाजारामध्ये मोठी गुंतवणूक

Pune News : औंधमध्ये पोलिस उपनिरीक्षकाने संपविले जीवन; राहत्या घरी शासकीय पिस्तुलातून झाडली गोळी

Numerology: 'या' मूलांकाच्या दीर-वहिनीची जोडी का मानली जाते नंबर वन? नात्यात असते हसणे, चिडवणे, प्रेम अन् विश्वास...

गरबा आणि दांडिया एकच नाही! दोन्ही नृत्यप्रकार करण्याचीही आहे वेगवेगळी वेळ; जाणून घ्या नेमका फरक काय

Rahul Gandhi: ''माझ्याविरोधात 45 एफआयआर आहेत, 100 पाहिजेत...'' राहुल गांधींनी सुरु केला रस्त्यावरचा एल्गार

SCROLL FOR NEXT