छत्रपती संभाजीनगर

शटडाऊन संपला; आजपासून वितरणाचे टप्पे सुरळीत

CD
शटडाऊन संपला; पाणीपुरवठा सुरळीत --- वाहिन्यांची दुरुस्ती, जोडणीची कामे पूर्ण; काही भागांत उशिराने पुरवठा --- छत्रपती संभाजीनगर, ता. १३ : शहराचा पाणीपुरवठा अधिक सक्षम करण्यासाठी घेतलेला २४ तासांचा शटडाऊन मंगळवारी (ता. १३) सकाळी संपला. त्यानंतर लगेचच मुख्य जलवाहिन्यांमध्ये पाणी सोडून वितरण सुरू करण्यात आले. मात्र, या शटडाऊनमुळे पाणी वितरणाचे वेळापत्रक विस्कळित झाले. बहुतांश भागांमध्ये नियोजित वेळेपेक्षा पाच ते सहा तास उशिराने पाणी मिळेल, तर काही ठिकाणी एक दिवसाचा गॅप (खंड) पडेल. त्यामुळे दुरुस्ती आणि जोडणीची सर्व कामे पूर्ण झाली असली, तरी वितरणाचे टप्पे पूर्ववत होण्यासाठी नागरिकांना अजून २४ तासांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी सोमवारी (ता. १२) सकाळी आठपासून मंगळवारी (ता. १३) सकाळी आठपर्यंत शटडाऊन घेण्यात आला होता. या काळात मुख्य जलवाहिनीवरील गळती दुरुस्ती आणि नवीन पाणीपुरवठा योजनेतील जलकुंभांना जोडणी देण्याची कामे नियोजनानुसार पूर्ण करण्यात आली. यामध्ये १,११८ मिमी व्यासाच्या मुख्य जलवाहिनीवरील गळती दुरुस्त करण्यात आली. शिवाय आमेरनगर, सुधाकरनगर, एसएफएस गारखेडा आणि ए.जी.पी. हायस्कूल परिसरातील जलकुंभांना जोडणी देण्यात आली. ज्योतीनगर आणि विश्वभारती परिसरातील जलकुंभ भरण्यासाठीही मुख्य जलवाहिनीला छेद जोडणी देण्याचे काम पूर्ण झाले, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता डी. पी. गायकवाड यांनी दिली. --- दुपारी अडीचनंतर वितरणाचे टप्पे सुरू मंगळवारी सकाळी मुख्य जलवाहिन्यांमध्ये पाणी सोडून त्या भरण्यास सुरवात झाली. जलवाहिन्या भरण्यास पाच ते साडेपाच तासांचा अवधी लागला. दुपारी अडीचपर्यंत जलवाहिन्या भरल्यानंतर सिडकोसह शहराच्या सर्व भागांतील पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. --- सिडकोतील वितरणाचे टप्पे विस्कळित यापूर्वी ९ ऑक्टोबरला घेतलेला शटडाऊन नियोजित २४ तासांऐवजी सुमारे ३० तास चालला होता. त्यानंतर पुन्हा २४ तास पाणीपुरवठा बंद राहिल्याने सिडकोसह शहरातील वितरणाचे वेळापत्रक बिघडले आहे. जलवाहिन्यांत पाणी सोडले असले, तरी प्रत्येक भागातील वितरण पूर्ववत होण्यास वेळ लागणार आहे. त्यामुळे बहुतांश भागांत एक दिवस उशिराने पाणी मिळेल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Rally: शेअर बाजारात तुफान तेजी! गुंतवणूकदारांची चांदी; सेन्सेक्स १,१०९ अंकांनी वधारला

Pregnant journalist allegation: गर्भवती महिला पत्रकाराला राहुल गांधींनी धक्का दिल्याचा आरोप; 'एक्स-रे'वरून काँग्रेसने उपस्थित केला प्रश्न

Latest Marathi News Live Update: ज्ञानेश कुमार हे माफिया आहेत- संजय राऊत

WTC Points Table: ऑस्ट्रेलियाच्या विजयाने भारताच्या WTC Final खेळण्याच्या स्वप्नाचा चुराडा? जाणून घ्या समीकरण

Pune News : गंभीर आजारी वडिलांचे पालकत्व मुलीकडे; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय, ‘पेरेन्स पॅट्रिए’ तत्त्वाचा आधार

SCROLL FOR NEXT