weather update maharashtra rain in Nashik Nagar Marathwada Pre-monsoon rains sakal
छत्रपती संभाजीनगर

राज्यात काही ठिकाणी पावसाची हजेरी...

मराठवाड्यासह नाशिक, नगर जिल्ह्यांत वरूणराजा बरसला

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद/नाशिक : मराठवाड्यासह नाशिक, नगर जिल्ह्यांत मॉन्सूनपूर्व पावसाने वादळी वारे, ढगांच्या गडगडाटासह हजेरी लावली. त्यामुळे, गेले तीन महिने कडक उन्हात होरपळणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळाला. औरंगाबाद शहरातील काही भागांत पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावली. शहरात दुपारपर्यंत उन्हाचा कडाका होता. सायंकाळी अचानक वातावरण बदलले. ढगांच्या गडगडाटासह शहरातील अनेक भागांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला.

परभणीसह जिल्ह्यात बुधवारी रात्री पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यात सरासरी १२.८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला होता.

उस्मानाबादेत ४६ मि.मी पाऊस

उस्मानाबाद ः शहरात बुधवारी (ता. ८ ) मध्यरात्री पावसाने जोरदार हजेरी लावली. सुमारे ४६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला. मध्यरात्री जोरदार वाऱ्यासह पावसाला सुरवात झाली. सुमारे पाऊणतास जोरदार पाऊस झाला. शहरातील नाले खळाळले.

विजेच्या धक्क्याने बालक ठार

सावदा (जि.जळगाव) रावेर तालुक्यात बुधवारी (ता. ८) वादळी पावसाने केळी बागा उद्ध्वस्त झाल्या. खिरोदा येथे विजेच्या तारा जमिनीवर पडल्याने विजेचा धक्का लागून साडेतीन वर्षांच्या बालकाचा मृत्यू झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray : ''...अन् बाळासाहेबांनी मराठीसाठी सत्तेवर लाथ मारली''....राज ठाकरेंनी सांगितला २६ वर्षांपूर्वीचा तो किस्सा!

Manoj Jarange: मनोज जरांगे पाटील यांना नारायण गडावर महापूजेचा मान; मराठा समाजाचा सन्मान!

गेटवर वाट बघत थांबलेला एकटा शूटर, ६ सेकंदात भाजप नेत्याची हत्या; CCTV फूटेज समोर

Latest Maharashtra News Updates : सहकार क्षेत्राला शैक्षणिक बळ देणारा ऐतिहासिक टप्पा : केंद्रीय गृहमंत्री व सहकारमंत्री

Delhi Crime: शहर हादरलं! एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह घरात आढळले; मृत्यू कशामुळे?

SCROLL FOR NEXT