छत्रपती संभाजीनगर

बनावट दूध निर्मितीप्रकरणी दिलीप हंबर्डे यांना अटक (सुधारित)

CD
व्हे पावडर तस्करीप्रकरणी दिलीप हंबर्डे अखेर गजाआड बनावट दुधाच्या रॅकेटवर आष्टी पोलिसांची कारवाई आष्टी, ता. ३१ (बातमीदार) : दुधात भेसळ करून कृत्रिम दूध तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या व्हे पावडरच्या अवैध वाहतूक व साठवणुकीप्रकरणी आष्टी पोलिसांनी दिलीप जानदेव हंबर्डे (वय ५५, रा. आष्टी) याला रविवारी (ता. ३०) मध्यरात्री अटक केली. यापूर्वी अटक केलेल्या आरोपीच्या चौकशीतून हंबर्डे याचे नाव समोर आले असून, आष्टी-जामखेड परिसरातील दूध संकलन केंद्रे व डेअऱ्यांमध्ये भेसळयुक्त दूध निर्मितीची साखळी कार्यरत आहे का, याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. १८ ऑगस्ट रोजी रात्री आष्टी-जामगाव रस्त्यावरील नक्षत्र लॉन्स व हर्षद हॉटेलसमोर पोलिसांनी सापळा रचून एमएच-१३ सीयू-४१४१ महिंद्रा पिकअपमधून २५ किलो वजनाच्या ४७ गोण्या व्हे पावडर जप्त केली होती. चालकाकडून मिळालेल्या माहितीवरून आष्टी शहरातील बाळासाहेब जाधवर यांच्या घराजवळील पत्र्याच्या शेडमधून आणखी २५ गोण्या जप्त करण्यात आल्या. या कारवाईत एकूण ७२ गोण्या व्हे पावडर आणि वाहनासह २ लाख ६९ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. बीडचे अन्न सुरक्षा अधिकारी अजय भगवान गाडे यांच्या फिर्यादीवरून आष्टी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ मधील विविध कलमांनुसार सुशांत ऊर्फ बाबू गोपाळघरे, हरिदास गोपाळघरे आणि कैलास हंबर्डे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. सुशांतला १९ ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली होती. त्याच्या कसून चौकशीत व्हे पावडरचा पुरवठा दिलीप हंबर्डे याच्या सांगण्यावरून होत असल्याचे समोर आल्याने त्याला सोमवारी मध्यरात्री अटक करण्यात आली. ---------- आठ दिवसांची पोलिस कोठडी आरोपी दिलीप जानदेव हंबर्डे याला सोमवारी (ता. ३१) आष्टी येथील न्यायालयासमोर हजर करण्यात आले. पोलिसांनी अधिक तपासासाठी कोठडीची मागणी केली असता, न्यायालयाने हंबर्डे याला आठ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. जप्त व्हे पावडरचा पुरवठा नेमका कोणत्या डेअऱ्यांना केला जात होता आणि यात आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा शोध पोलिस घेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दिल्ली-महाराष्ट्रात कोट्यवधी मतदारांची नावं वगळली; SIR ड्राफ्टमध्ये तुमचं नाव आहे का? कसं चेक करायचं?

Horoscope: जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांची खास स्थिती; ‘या’ ४ राशींचं नशीब अचानक चमकणार? पैसा, करिअरमध्ये प्रगतीसह मोठ्या धनलाभाचे संकेत

जंतर-मंतर CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील FIR मागे घेण्यासाठी सरकारची सुप्रीम कोर्टात धाव; काय आहे अनुच्छेद 142?

Marathi News Live Updates : भारतातील बोगदा बचाव पथकाची नेपाळी लष्करासोबत भागीदारी

‘निपुण’ भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल! खोल समुद्रातील मोहिमा करणार, पाणबुडी बचाव क्षमतेला बळ; पाहा वैशिष्ट्ये

SCROLL FOR NEXT