Aggressive Dog Behavior Sakal
छत्रपती संभाजीनगर

Aggressive Dog Behavior : श्वान आक्रमक होऊन का चावतो?

Aggression in dogs : विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती केली जात आहे. शहरात ठिकाठिकाणी रस्त्यावर आक्रमक श्वान दिसतात. हे श्वान आक्रमक का होतात याची माहिती त्यांनी दिली. विशेषतः भूकमारीमुळे श्वानांना अन्नाच्या शोधात भटकंती करावी लागते.

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : लाइफ केअर ॲनिमल वेल्फेअर असोसिएशन संस्थेतर्फे श्वान आणि श्वान चावल्यानंतर होणाऱ्या रेबीजबद्दल शहरातील विविध शाळेत ॲँटी रेबीज जनजागृती मोहीम सुरू करण्यात आली. श्वान आक्रमक होऊन का चावतो, श्वान चावल्यावर काय करावे, यावर मार्गदर्शन केले जात आहे.

मनपाच्या नारेगाव, किराडपुरा तसेच चेलीपुरा येथील उर्दू शाळेमध्ये लाइफ केअर ॲनिमल वेल्फेअर असोसिएशन संस्थेतर्फे संस्थेचे सचिव जयेश शिंदे यांनी श्वान व अँटी रेबीज विषयावर मार्गदर्शन केले. मुले श्वानांकडे अधिक आकर्षित होतात.

त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती केली जात आहे. शहरात ठिकाठिकाणी रस्त्यावर आक्रमक श्वान दिसतात. हे श्वान आक्रमक का होतात याची माहिती त्यांनी दिली. विशेषतः भूकमारीमुळे श्वानांना अन्नाच्या शोधात भटकंती करावी लागते.

त्यात आजारी, जखमी झालेले श्वान असतील तर त्यांच्यात चिडचिड निर्माण होते. बहुतांश श्वान हे भुकेमुळे व्याकूळ होऊन आक्रमक होतात. अशा परिस्थितीत श्वानाने चावा घेतला तर काय करावे याची माहिती देण्यात आली.

श्वान चावल्यानंतर तातडीने चावलेल्या जागेवरची जखम ही थंड व स्वच्छ पाण्याने पंधरा ते वीस मिनिटे धुवावी, त्यानंतर तत्काळ रुग्णालयात जाऊन डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ॲँटीरेबीज इंजेक्शन घ्यावे, असे शिंदे यांनी सांगितले.

अनेक जण श्वान चावल्यानंतर घरी हळद लावतात, कुणी घरातील मलम, ट्यूब लावतात. मात्र, असे काहीही मनाने करू नये असे केल्याने शरीरामध्ये जंतू संसर्ग होण्याचा धोका वाढण्यास मदत होते.

किराडपुरा येथील शाळेमध्ये मुख्याध्यापिका रईसा बेगम, शिक्षक रहीम शेख, शहबाज शेख, वसीम मिर्झा, आदित्य पारकर नारेगाव शाळेच्या मुख्याध्यापिका संगीता ताजवे, उर्दूचे मुख्याध्यापक सय्यद अब्रार अहमद, शेख जुबेर, कैलास टेकाळे वसीम मिर्झा यांची उपस्थिती होती.

पावसाळ्यात घ्या काळजी

सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. त्यामुळे श्वान आक्रमक होतात. याशिवाय साप व सरपटणारे प्राणी घरामध्ये येऊ शकतात. त्यामुळे घराच्या परिसरात स्वच्छता ठेवावी, पाणी साचून डासांची उत्पत्ती होते. त्यामुळे खड्डे होणार नाही, रिकाम्या कॅरिबॅग, बाटल्यांचे झाकण, उघडे डबे पडून पाणी साचणार नाही, याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे प्रबोधनही यावेळी करण्यात आले. स्मार्ट सिटीतर्फे ओला व सुका कचरा वर्गीकरण करावा याच्या माहितीची पत्रके व स्टिकर विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tata Group: शेअर बाजार उघडताच TCSचे शेअर्स कोसळले; गुंतवणूक करावी की नाही, तज्ज्ञ काय म्हणतात?

Homemade Glow Mask: 'या' 4 प्रकारे चेहऱ्यावर मुलतानी माती लावा अन् 15 मिनिटांत चेहऱ्यावर येईल अद्भुत चमक

"मी महाराष्ट्राची मुलगी" मराठी भाषा विवादावर शिल्पाने बोलणं टाळलं; "मला या वादावर.."

'हार मानणार नाही, पुन्हा नव्याने सुरुवात करु' कॅनडातील कॅफेवरील गोळीबानंतर कपिल शर्माची प्रतिक्रिया

Pune Accident: दुर्दैवी घटना! 'उंडवडी सुपे येथील अपघातात दाेनजण जागीच ठार'; कार व दुचाकीचा भीषण अपघात

SCROLL FOR NEXT