wife along with her boyfriend killed husband over love affair police crime esakal
छत्रपती संभाजीनगर

Renapur Crime News : पत्नीने काढला पतीचा काटा; रेणापूरमध्ये अल्पवयीन प्रियकराच्या मदतीने खून

अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा पत्नीने अल्पवयीन प्रियकराच्या मदतीने खून केल्याची खळबळजनक घटना

सकाळ वृत्तसेवा

रेणापूर : अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा पत्नीने अल्पवयीन प्रियकराच्या मदतीने खून केल्याची खळबळजनक घटना डिघोळ देशमुख (ता.रेणापूर) येथे शनिवारी (ता.६) रात्री उशिरा उघडकीस आली.

वैभव ज्योतीराम निकम (वय ३४) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी त्याची पत्नी व तिच्या प्रियकराला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वैभव ज्योतीराम निकम हा टेंपोचालक असून तो पत्नी, मुलगा, मुलीसह गावात वास्तव्यास होता.

कोणाला काही न सांगता तो दोन जानेवारीपासून घराबाहेर पडला होता. प्रयत्न करूनही शोध लागत नसल्याने त्याचा भाऊ सूरज ज्योतीराम निकम यांनी पाच जानेवारीला रेणापूर पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची फिर्याद दिली होती.

दरम्यान सहा जानेवारीला डिगोळ देशमुख शिवारातील श्रीराम पवार यांच्या शेतालगत मृतदेह आढळला. पोलिस निरीक्षक अशोक अनंत्रे, जमादार एस. व्ही. शेंबाळे व त्यांचे सहकाऱ्यांनी पंचनामा केला.

चाकूर - रेणापूर उपविभागाचे उपअधिक्षक बी. चंद्रकांत रेड्डी यांनी तपासाच्या सूचना केल्या. वैभवचा भाऊ सूरज ज्योतीराम निकम यांनी शनिवारी (ता. ६) रात्री रेणापूर पोलिसांत फिर्याद दिली.

‘माझी भावजय आणि तिच्या प्रियकराला माझ्या भावाने एकत्र बघितले. तो अनैतिक संबंधात अडसर ठरल्याने भावजय व अल्पवयीन प्रियकराने मिळून भावाच्या डोक्यात काठी मारून जखमी केले. नंतर दोघांनी मिळून त्याचा गळा आवळून खून केला.

शेतालगत मृतदेह फेकून दिला. रक्ताने माखलेली गोधडी घरामागे जाळून टाकली’ असे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार पोलिसांनी संशयित दोघांविरुद्ध गुन्हा नोंद केला. जिलानी मानुल्ला तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bihar Assembly Elections 2025: अखेर बिहारमध्ये रणशिंग फुंकलं! निवडणूक आयोगाकडून विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर

Kojagiri Pournima : किल्ले रायगड आजही विसरू शकणार नाही कोजागिरीशी जोडला गेलेला शिवाजी महाराजांचा इतिहास, हिरा बनली हिरकणी...

फक्त सिंधुताई माझी माईच नाही तर या निर्मिती संस्थांमध्येही गैरव्यवहार ! पारू फेम अभिनेत्याने नावंच जाहीर केली

Best Credit Cards For Women: महिलांसाठी बेस्ट आहेत 'हे' क्रेडिट कार्ड, जाणून घ्या तुमच्यासाठी कोणतं आहे योग्य

Jasprit Bumrah: '...तर कदाचित बुमराह कधी गोलंदाजी करू शकला नसता', मोहम्मद सिराजने उलगडलं बुमराहच्या 'वर्कलोड'चं कोडं

SCROLL FOR NEXT