Crime News Sakal
छत्रपती संभाजीनगर

Crime News : पत्नीचे गावातीलच व्यक्तीसोबत अनैतिक संबंध! सांगूनही न ऐकल्याने पतीने संपवलं जीवन

दोन दिवसांपूर्वीच विष घेऊ आत्महत्येचा त्याने प्रयत्न केला होता पण नातेवांईकांनी त्याला तात्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते.

सकाळ डिजिटल टीम

सिल्लोड : पत्नीचे प्रियकरासोबत असलेल्या अनैतिक संबंधामुळे त्रस्त झालेल्या पतीने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी (ता. २०) सिल्लोड शहरालगतच्या रजाळवाडी परिसरात घडली आहे. याप्रकरणी मृताच्या भावाने सिल्लोड शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून मृताच्या पत्नीसह तिच्या प्रियकरावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रदीप गंगाराम आरके (३०, रा. गणेश कॉलनी, सिल्लोड) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी अनिता आरके, भाऊसाहेब विजय आरके यांच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आली आहे.

रजाळवाडी परिसरातील जगन्नाथ आरके याने फिर्याद दिली, की भाऊ प्रदीप आरके याचा विवाह अनितासोबत सात वर्षांपूर्वी झाला होता. त्यांना दोन मुली आहे. दरम्यान, मोठ्या वहिनीचे भाऊसाहेब आरकेसोबत प्रेमसंबंध असल्याची माहिती त्यास होती. याची माहिती त्याने भावास दिली. त्यानंतर त्यांनी अनिता व भाऊसाहेब यांना समजावून देखील सांगितले होते. परंतु दोघांनी मिळून प्रदीप याला शिवीगाळ करून मानसिक त्रास दिला. त्यामुळे भाऊ कायम तणावात होता.

या त्रासाला कंटाळून भावाने आत्महत्या केल्याची फिर्यादीत नमुद करण्यात आले. त्यामुळे पोलिसांनी याप्रकरणी मृताची पत्नी अनिता आरके तिचा प्रियकर भाऊसाहेब आरके यांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून त्यांना ताब्यात घेतले आहे.

तीन दिवसांपूर्वी आत्महत्येचा प्रयत्न

१७ ऑगस्टला प्रदीप आरके याने पत्नी व तिच्या प्रियकराच्या अनैतिक संबंधाच्या कारणामुळे घरातच विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. परंतु नातेवाईकांनी त्याला तत्काळ दवाखान्यात दाखल करून त्याचा जीव वाचविला होता. परंतू १८ ऑगस्टला त्याला दवाखान्यातून सुटी मिळाल्यानंतर तो सिल्लोड येथे आला होता. त्यानंतर दोनच दिवसांत त्याने आत्महत्या केली.

मृताजवळ मिळाली सुसाईड नोट

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत प्रदिप आरके यांच्याजवळ सुसाईड नोट मिळाली आहे. त्यामध्ये त्याने त्याची पत्नी व तिच्या प्रियकरामुळे आत्महत्या करीत असल्याचे लिहले आहे. पोलिसांनी शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिला.

झाडाला घेतला गळफास

२० ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास प्रकाश आरके शेतात गेला असता त्याला त्याचा मोठा भाऊ प्रदीप आरके झाडाला लटकलेला दिसला. त्याने याची माहिती पोलिसांना दिली. घटनास्थळी पोलिस दाखल झाल्यानंतर मृतदेह झाडावरून उतरून रूग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commonwealth Games 2026 : आजोबा भाजी विकायचे, वडील शिवणकाम करतात... लव्हप्रीतने भारतासाठी जिंकले ऐतिहासिक पदक!

Commonwealth Games 2026 : घोर निराशा... तजिंदरपाल सिंग तूर पदक जिंकण्यापासून वंचित, समरदीप सिंगलाही अपयश; नेमकं कुठे चुकले?

Anti paper leak bill: विरोधकांचा सभात्याग अन् 'पेपरफुटी'विरोधी विधेयक राज्यसभेत मंजूर; अंतिम मंजुरीसाठी राष्ट्रपतींकडे पाठवले जाणार

Phule Wada Memorial Delay: फुले वाडा व सावित्रीबाई फुले स्मारकाचे काम संथ; छगन भुजबळ यांची पुणे महापालिकेवर कडक टीका

Pune Police Misconduct: तपासाऐवजी पर्यटन; विश्रामबागेतील तीन पोलिसांवर कारवाई, दोन वर्षे वेतनवाढ रोखली

SCROLL FOR NEXT