छत्रपती संभाजीनगर

यशवंत महाविद्यालयात राष्ट्रीय वन्यजीव सप्ताहानिमित्त विशेष उपक्रम

CD
यशवंत महाविद्यालयात वन्यजीव संवर्धनाविषयी जनजागृती नांदेड : राष्ट्रीय वन्यजीव सप्ताहानिमित्त यशवंत महाविद्यालयाच्या प्राणीशास्त्र विभागातर्फे ‘संग्रहालयीन नमुन्यांपासून वन्यजीव संवर्धनापर्यंत : वन्यजीव विविधतेचा शोध’ या विषयावर विशेष उपक्रम घेण्यात आला. महाविद्यालयातील विविध विद्याशाखांतील ९४ विद्यार्थी, महात्मा फुले हायस्कूलचे ४० विद्यार्थी आणि सावित्रीबाई फुले हायस्कूलच्या १०७ विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी संग्रहालयातील नमुन्यांचे निरीक्षण करून जैवविविधता व वन्यजीव संवर्धनाची माहिती जाणून घेतली. अध्यक्षस्थानी माजी प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ. गणेशचंद्र शिंदे होते. प्रास्ताविकात समन्वयक डॉ. मंगल कदम यांनी वन्यजीव संरक्षण, पर्यावरणीय समतोल आणि जैवविविधतेचे महत्त्व स्पष्ट केले. प्राणीशास्त्र विभागप्रमुख डॉ. संजय नन्नवरे यांनी संग्रहालयीन नमुने, प्राण्यांची विविधता, अधिवास संवर्धन आणि परिसंस्थेतील प्रत्येक जीवाचे महत्त्व विशद केले. संग्रहालयीन नमुने हे उत्क्रांतीचा इतिहास समजून घेण्यासाठी आणि संवर्धनाची गरज अधोरेखित करण्यासाठी महत्त्वाचे ज्ञानस्रोत असल्याचे त्यांनी सांगितले. सूत्रसंचालन धनश्री चव्हाण यांनी केले. यशस्वितेसाठी डॉ. हनुमानलू तमलुरकर, डॉ. नितारानी जैस्वाल, डॉ. धनराज भुरे, डॉ. बी. बालाजीराव, प्रा. साहेबराव माने, प्रा. नारायण गव्हाणे, डॉ. दीप्ती तोटावार आणि डॉ. रोहिणी चव्हाण यांनी सहकार्य केले.

IND vs NZ : हार्दिकचा पत्ता कट करायला, मुंबईचा २३ वर्षीय ऑल राऊंडर येतोय; न्यूझीलंड दौऱ्यासाठी वन डे संघात निवडीची जोरदार चर्चा...

SPPU Campus Agitation Row : पुणे विद्यापीठात आंदोलने, मोर्चे आणि निदर्शनांवर बंदी! व्यवस्थापन परिषदेच्या निर्णयावरून विद्यार्थी संघटना आक्रमक

Maharashtra Live News : जखमी तरुणासोबत राहुल गांधींची पत्रकार परिषद; "तरुणांच्या आवाजापुढे कोणीही टिकणार नाही"

Kolhapur Water Crisis : पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य! धरणांमधील 10 टक्के पाणी राखून ठेवा; जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांचे महत्त्वाचे आदेश

WhatsApp चे नवीन धमाकेदार फीचर! आता 10 मिनिटांपासून 14 दिवसांपर्यंत आधीच शेड्यूल करा मेसेज, फोटो अन् व्हिडिओ...

SCROLL FOR NEXT