State Board Exam
State Board Exam sakal
छत्रपती संभाजीनगर

State Board Exam : परीक्षा कॉपीमुक्तच व्हावी ; जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या. यानुसार बारावीची परीक्षा ही २१ फेब्रुवारी ते १९ मार्च या कालावधी होणार आहे तर दहावीची परीक्षा १ ते २६ मार्चदरम्यान होणार आहे. जिल्ह्यात कोणत्याही परीक्षा केंद्रांवर गैरप्रकार होणार नाही, याची कटाक्षाने दक्षता घ्यावी. परीक्षेला कॉपीमुक्त अभियानाची अंमलबजावणी करा, अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या.

जिल्ह्यात इयत्ता बारावीसाठी एकूण १६४ परीक्षा केंद्रांवर ६३ हजार २०३ विद्यार्थी; तर इयत्ता दहावीसाठी एकूण २३२ परीक्षा केंद्रांवर ६७ हजार २९४ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले. या परीक्षेची पूर्व तयारी म्हणून तालुकास्तरावर पालकांच्या बैठका घेण्यात येत आहेत.

जिल्ह्यातील सर्व परीक्षा केंद्र असलेल्या शाळांच्या संस्थांचे प्रमुख/प्रतिनिधी व केंद्रावरील केंद्र संचालक यांची संयुक्त कार्यशाळा होणार आहेत. जिल्ह्यात कोठेही गैरप्रकार होणार नाही, याची दक्षता घेण्यात येणार आहे. राज्य परिवहन महामंडळाने विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर जाण्यासाठी अर्धा तास आधी एसटी बस पोचेल, अशी सुविधा ठेवावी. वीज वितरण कंपनीने वीज सुरळीत राहील, याची जबाबदारी पूर्ण करावी, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

कॉपीमुक्तीसाठी सर्व यंत्रणा अलर्ट

शिक्षण विभागातर्फे सात; तर महसूल विभागाची १० भरारी पथके परीक्षा केंद्राला अचानक भेटी देणार आहेत. सर्व परीक्षा केंद्रावर बैठे पथके परीक्षा आधी एक तास ते परीक्षेनंतर एक तास (उत्तरपत्रिका ताब्यात घेईपर्यंत) उपस्थित राहणार आहे. यासह मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी तालुकानिहाय संपर्क अधिकारी म्हणून खाते प्रमुखांच्या नेमणुका केल्या आहेत. परीक्षा केंद्रावर जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी देखील भेटी देण्याचे नियोजन केले आहे.

पोलिसांचा चोख बंदोबस्त

परीक्षा केंद्राच्या ५० मीटर परिसरात अनधिकृत व्यक्तींना प्रवेश नाही. परीक्षा केंद्रावर कलम १४४ अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश देण्यात आले आहेत. परीक्षा केंद्रात विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याअगोदर अंगणवाडी सेविका, मदतनीस, शिक्षक कर्मचाऱ्यांकडून शंभर टक्के विद्यार्थ्यांची झाडाझडती घेण्यात येईल.

आकडे बोलतात

  • बारावीसाठी

    प्रविष्ट विद्यार्थी : ६३ हजार २०३ :परीक्षा केंद्र १६४ : परिरक्षक : २१

  • दहावीसाठी

    विद्यार्थी :६७ हजार २९४,

    परीक्षा केंद्र : २३२ : परिरक्षक : २१

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadanvis: 'उद्धव ठाकरेंचं रडगाणं सुरू, पराभव समोर दिसू लागल्यानेच त्यांची मोदींवर टीका'; देवेंद्र फडणवीसांचा आरोप

Latest Marathi Live News Update : तामिळनाडूत रात्रीपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पूरस्थिती

Rohit Sharma: रोहितने प्रायव्हसीचा भंग करण्याच्या आरोपावर स्टार स्पोर्ट्सनं दिलं स्पष्टीकरण

Anuskura Ghat : अणुस्कुरा घाटातील जंगलात लपलेल्या चोरट्यांच्या आवळल्या मुसक्या; मागावर होतं तब्बल 30 पोलिसांचं पथक, असं काय घडलं?

Accident News : छत्तीसगडमध्ये मृत पावलेले १८ जण आदिवासींच्या संरक्षित जमातीमधील; राष्ट्रपतींनी व्यक्त केल्या संवेदना

SCROLL FOR NEXT