sakal
छत्रपती संभाजीनगर

वाळूज महानगर भागासाठी करणार ५० कोटींची तरतूद

हस्तांतरणापूर्वीच महापालिका प्रशासकांच्या सूचना

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद: सिडकोने विकसित केलेल्या वाळूज महानगराचा महापालिका हद्दीत समावेश करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीची बैठक बुधवारी (ता. २२) घेण्यात आली. त्यात या भागाला मूलभूत सुविधा देण्यासाठी महापालिकेच्या अंदाजपत्रकात ५० कोटी रुपयांची तरतूद करा, अशा सूचना महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी अधिकाऱ्यांना केल्या.

महापालिकेची हद्दवाढ करून बजाजनगरसह वाळूज एमआयडीसीचा भाग समाविष्ट करण्यासाठी हालचाली सुरू आहेत. बांधकाम व्यावसायिकांची संघटना क्रेडाईतर्फे यासंदर्भात मागणी करण्यात आली होती. दरम्यान, सिडकोने विकसित केलेल्या वाळूज महानगरचा अभ्यास करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीची बैठक बुधवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रात घेण्यात आली.

यावेळी वाळूज सिडको महानगरातील मूलभूत सुविधांबाबत चर्चा झाली. त्यात पाणी पुरवठा, रस्ते, पथदिवे व ड्रेनेज सुविधांचा समावेश होता. तसेच संभाव्य कामांचा अंदाज काढून सिडकोने महापालिकेस डेव्हलपमेंट चार्जेस भरावेत, यावर सहमती दर्शविण्यात आली. सद्यःस्थितीत उपलब्ध असलेल्या नागरी सुविधा रस्ते, ड्रेनेज लाईन व पथदिवे याची देखभाल व दुरुस्ती महापालिका करील. यापुढे नवीन रेखांकन आणि बांधकाम परवानगी देण्याचे अधिकार महापालिकेकडे असतील.

यावेळी प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी वाळूज महानगर येथील देखभाल दुरुस्ती व इतर विकास कामांसाठी महापालिकेच्या अर्थसंकल्पात ५० कोटी रुपयांची तरतूद ठेवण्याची सूचना अधिकाऱ्यांना केली. बैठकीला अतिरिक्त आयुक्त बी. बी. नेमाने, शहर अभियंता सखाराम पानझडे, प्रभारी मुख्य लेखाधिकारी संजय पवार, उपायुक्त अपर्णा थेटे, कार्यकारी अभियंता बी. डी. फड, ए. बी. देशमुख, घनकचरा व्यवस्थापन कक्षप्रमुख नंदकिशोर भोंबे यांच्यासह समितीतील अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

या भागासाठी पाच हजार पथदिवे राखीव ठेवण्याचे निर्देश यावेळी पांडेय यांनी दिले. या भागात पाणी पुरवठ्याचा शहराच्या नवीन पाणी पुरवठा योजनेत समावेश करता येईल असे पांडेय यावेळी म्हणाले. सिडको वाळूज महानगरची ड्रेनेजलाइन कांचनवाडी एसटीपी प्लांटशी जोडण्याबाबत चर्चा करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thalapathy Vijay Divorce Case : मुख्यमंत्री विजय थलपती यांचे विवाहबाह्य संबंध? घटस्फोट प्रकरणातील सुनावणीबाबत मोठी अपडेट समोर; दोघांनाही कोर्टात राहण्याचे आदेश

Online Scam : मुंबईची घटना! मोबाईल गरम होताच बँक अकाऊंटमधले 70 हजार गायब, फ्रॉड नेमका काय? सुरक्षित कसं राहायचं पाहा

Latest Marathi News Live Update : कर्जमाफीच्या मागणीसाठी शेतकऱ्याचा टोकाचा निर्णय! विहिरीत उडी मारून केला निषेध

India A Squad Change: भारतीय संघात सलग दोन पराभवांनंतर अचानक बदल; 150 KPH वेगानं गोलंदाजी टाकणाऱ्या खेळाडूची निवड

Telegram Ban India : NEET परीक्षेसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय; टेलिग्रामवर तात्पुरती बंदी, 'या' तारखेपासून पुन्हा होणार सुरू

SCROLL FOR NEXT