वायरमन शरद थोरवे
वायरमन शरद थोरवे सकाळ
छत्रपती संभाजीनगर

वीजपुरवठा सुरळीत करताना वायरमनचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

सकाळ डिजिटल टीम

आष्टी (जि.बीड) : आष्टी (Ashti) तालुक्यातील पिंपळा उपकेंद्राअंतर्गत येणाऱ्या खरडगव्हाण फाटा येथील विद्युत पोलवर (Electricity) चढून वीज सुरळीत करताना शरद पांडुरंग थोरवे (वय ४०) यांचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (ता.१८) घडली. आष्टी तालुक्यातील खुंटेफळ येथील शरद पांडुरंग थोरवे हे महावितरण कंपनीच्या (Mahavitran Company) पिंपळा उपकेंद्रात वरिष्ठ तंत्रज्ञ म्हणून कार्यरत होते. पिंपळा उपकेंद्राअंतर्गत येणाऱ्या पारोडी बोरोडी या मार्गाचा विद्युत पुरवठा खंडित झाला होता. खंडीत विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी शरद थोरवे हे मंगळवारी (ता.१८) दुपारी १ वाजेच्या सुमारास खरडगव्हाण फाटा परिसरातील एका विद्युत खांबावर चढले असता अचानक विद्युत पुरवठा सुरू झाल्याने ते तारेला चिकटले व नंतर खाली पडले. (Wireman Died Due To Electricity Shock In Ashti)

यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. वीज प्रवाह सुरळीत करण्यासाठी सदरील वायरमनला उपकेंद्रातून परमिट घ्यावे लागते. शरद थोरवे हे अनुभवी वरिष्ठ तंत्रज्ञ असल्याने त्यांनी परमिट घेतले होते का? तसेच लाईन दुरुस्तीसाठी त्यांना सोबत साहाय्यक घ्यावा लागतो. ते एकटेच लाईन दुरुस्ती कसे करीत होते? असे प्रश्न उपस्थित होत असून मृत्यूचे खरे कारण हे पोलिस तपासात समोर येईल. मृत शरद थोरवे यांच्यावर कडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करून खुंटेफळ येथे सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुले, भाऊ असा परिवार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात.. कित्येक दिग्गजांचं भवितव्य आज ईव्हीएममध्ये होणार कैद

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 7 मे 2024

Loksabha Election 2024 : मतदानाचा आज तिसरा टप्पा; राज्यातील ११ मतदारसंघांमध्ये तयारी पूर्ण

Dr. Amol Kolhe : आढळराव पाटील शब्द पाळणार का?

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

SCROLL FOR NEXT