छत्रपती संभाजीनगर

जिल्हाधिकाऱ्यांनी पाचशे रुपयांचा दंड केला अन् जागेवर मास्क ही दिला

शेखलाल शेख

औरंगाबाद: विमा मास्क फिरणाऱ्यांना दंड तसेच जागेवरच मास्क देणार असल्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले होते. त्यानंतर त्यांनी मंगळवार (ता.२५) रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात रोहयो शाखेतर्फे आयोजित सामाजिक वनीकरण विभागाच्या बैठकीत विनामास्क आलेल्या चार अधिकारी, कर्मचाऱ्यांना पाचशे रुपयांचा दंड केला.

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन कसोशीने प्रयत्न करीत आहे. या प्रयत्नांचाच एक भाग म्हणून जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी मास्क परीधान न करणाऱ्यांना ५०० रुपये दंड लावून एक मास्क देण्याचा नुकताच आदेश काढला. या आदेशाची अंमलबजावणी जिल्ह्यात सुरुच आहे.

मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात रोहयो शाखेमार्फत आयोजित सामाजिक वनीकरण विभागाच्या बैठकीत विनामास्क उपस्थित असलेल्यांना जिल्हाधिकारी यांनी दंड केला.

यावेळी वैजापूर वनपरिक्षेत्र अधिकारी एम. के. रहाटवळ, सोयगाव वनपरिक्षेत्र अधिकारी ए. पी. मिसाळ, कन्नड वनपरिक्षेत्र अधिकारी छाया बानखेले, वाहनचालक साईनाथ चंदनसे या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना तसेच ज्ञानेश्वर त्रिभुवन या अभ्यागत यांनी मास्क परीधान न केल्यामुळे प्रत्येकी ५०० रुपये दंड आकारुन त्यांना एक मास्क देण्यात आला. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

गाडीतून उतर, लायसन दे! महिला पोलिसाने अडवलं, कॅब चालकाशी घातला वाद; VIDEO VIRAL

Mahashivratri 2026: साडेसातशे वर्षांपूर्वीचे पुरातन हेमाडपंथी शिवालय

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर मृत्यूचे तांडव! टँकरला भीषण आग, चालक जळून खाक

Devgad Hapus : देवगड हापूसचा मोहोर काही दिवसांत काळवंडला; हवामान बदल की अज्ञात संकटाने बागायतदारांच्या आशा हिरावल्या?

Mumbai Metro Tragedy: मेट्रो स्लॅब कोसळल्याने ठाणे–मुंबई वाहतूक ठप्प, एकाचा मृत्यू; 3 ते 4 जखमी

SCROLL FOR NEXT