छत्रपती संभाजीनगर

प्यारवाली लव्ह स्टोरीचा वेदनादायी शेवट,साडीने गळफास घेत संपवले

सुषेन जाधव

औरंगाबाद : विवाहित प्रेमी युगुलाने एकाच साडीने गळफास घेऊन जीवन संपविले. ही दुर्दैवी घटना मंगळवारी (ता.दहा) सकाळी दहाच्या सुमारास जटवाडा रस्त्यावरील एकतानगरात उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेतील प्रेयसी ही प्रियकरापेक्षा आठ वर्षांनी मोठी (Crime In Aurangabad) आहे. सीमा ईश्वर कांबळे (३५, रा. एकतानगर) आणि सचिन गंगाधर पेटारे (२७, रा. एन-१३, वानखेडेनगर, हडको) अशी आत्महत्या केलेल्या प्रेमी युगुलाची नावे आहेत. या प्रकरणा संदर्भात नातेवाइकांनी माहिती देताना सांगितले की, वानखेडेनगरातील सचिन पेटारे हा प्लंबिंग आणि बांधकामाच्या ठिकाणी मजुरीची कामे करत असे, तर सीमा हिचा (Aurangabad) पती एका गॅस एजन्सीवर कामाला आहे. गेल्या दोन वर्षांपूर्वीच सचिनचा विवाह झाला. तर सीमा ही गृहिणी होती. सचिनची सीमाच्या पतीमार्फत तिच्याशी ओळख झाली होती. या ओळखीतून दोघांचे प्रेम जुळले होते.

त्यांचे हे प्रेमप्रकरण सीमाच्या पतीला आणि सचिनच्या आई, बहिणीला माहिती होते. मात्र, सचिनची पत्नी या प्रेमप्रकरणापासून अनभिज्ञ होती. सचिन आणि सीमा नेहमी एकमेकांना भेटायचे. सचिन हा काम केलेले पैसे कधीही घरी देत नव्हता. त्याची आई भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करते. एक बहीण सातारा परिसरातील रुग्णालयात कामाला आहे. तर धाकटी बहीण आणि भाऊ शिक्षण घेतात. त्याच्या वडिलांना अर्धांगवायूचा आजार आहे. तसेच सीमाला एक मुलगी आणि दोन मुले आहेत. सचिन आणि सीमाला यापूर्वी त्यांच्या नातेवाइकांनी हे प्रेमप्रकरण थांबवा, अशी समज दिली होती. मात्र, दोघेही एकमेकांना सोडायला तयार नव्हते. अखेर मंगळवारी (ता.१०) सकाळी दोघांनी एकाच साडीने छताच्या हुकाला गळफास घेतला. हा प्रकार शेजारी राहणाऱ्या तरुणांच्या निदर्शनास आला. त्यांनी तत्काळ दोघांना बेशुद्धावस्थेत घाटीत दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या आकस्मिक मृत्यूची नोंद हर्सूल पोलिस ठाण्यात करण्यात आली.

आत्महत्येचे कारण गुलदस्त्यात

सीमा आणि सचिन यांच्या प्रेमप्रकरणाची माहिती तिच्या पतीसह त्याच्या कुटुंबीयांना देखील होती. मात्र ही बाब सचिनच्या पत्नीपासून लपवून ठेवण्यात आली होती. दोघांनी आत्महत्या केल्यानंतरच हा प्रकार सचिनच्या सासरच्या मंडळींना कळाला. दोघांनी आत्महत्या का केली याचे कारण समजू शकले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT