पाच हजार घेऊन ‘ति’ला दिले नराधमाच्या तावडीत Sakal
छत्रपती संभाजीनगर

Vaijapur Crime : पाच हजार घेऊन ‘ति’ला दिले नराधमाच्या तावडीत; वैजापुरातील महिलेचा कारनामा, दोघांवर गुन्हा दाखल

शहरातील एका महिलेचे पीडित मुलीच्या घरासमोर असलेल्या भाडेकरूकडे येणे-जाणे होते. यातून मुलीची व तिची ओळख झाली.

सकाळ वृत्तसेवा

वैजापूर : शहरातील एका महिलेने केवळ पाच हजार रुपयांसाठी सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीला नराधमाच्या ताब्यात दिले. त्यानंतर त्याने कारमधून नेऊन तिच्यावर लॉजमध्ये अत्याचार केला. याप्रकरणी रोहित चव्हाण (रा. मुंबई) याच्यासह वैजापूर येथील एका महिलेविरुद्ध वैजापूर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील एका महिलेचे पीडित मुलीच्या घरासमोर असलेल्या भाडेकरूकडे येणे-जाणे होते. यातून मुलीची व तिची ओळख झाली. ९ मार्च रोजी दुपारी चारच्या सुमारास पीडिता घरी असताना ती महिला तिथे आली व तिला सोबत घेऊन गेली. त्यानंतर मुलीच्या कुटुंबीयांनी तिचा परिसरात शोध सुरू केला. परंतु, ती मिळून आली नाही.

अखेर मुलीच्या आईने त्या महिलेला गाठून मुलीबाबत विचारणा केली. यावेळी ती गोंधळून गेली. परंतु, पीडितेच्या आईने ‘मुलगी कुठे आहे? खरं-खरं सांग’ असे म्हटल्यानंतर तिने तुमच्या मुलीला मी गंगापूर चौफुलीवर घेऊन गेले. तेथे ओळखीतील मुंबई येथील रोहित चव्हाण याचा फोन आला. मी मुलीला त्याच्यासोबत त्याच्या पांढऱ्या रंगाच्या

कारमध्ये बसवून दिले होते. त्याने मला पाच हजार रुपये दिले व एका तासात मुलीला आणून सोडतो, असे सांगितले होते. परंतु, बराच वेळ झाला रोहित चव्हाण हा मुलीला घेऊन गंगापूर चौफुलीवर आला नाही. त्यामुळे मी घरी निघून गेले, असे तिने सांगितले.

मुलीने आईला सांगितली आपबिती

अखेर १० मार्च रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास नराधमाने मुलीला कारने गंगापूर चौफुलीवर आणून सोडले व मुलीने आपले घर गाठले. ‘त्या महिलेने एका इसमाकडून ५ हजार रुपये घेऊन मला त्याच्या कारमध्ये बसवून दिले.

त्याने मला एका लॉजवर नेऊन ९ मार्चच्या सायंकाळी पाच वाजेपासून ते १० मार्चच्या सकाळी ११ वाजेपर्यंत इच्छेविरुद्ध अत्याचार केला'' असे तिने आईला सांगितले. पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून रोहित चव्हाण व त्या महिलेवर गुन्हा दाखल झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

घरासमोर खेळत होती चिमुकली, आईच्या डोळ्यादेखत कारनं चिरडलं; २ सेकंदात श्वास थांबला, घटना CCTVत कैद

Pune waste Management: बीपीसीएल तयार, पण पुणे महापालिकेसमोर १२ एकर जागेचा पेच; कचऱ्यापासून गॅस प्रकल्पाला बायोमायनिंगचा अडथळा

Thane: ९५ टक्के मिळूनही आवडतं कॉलेज नाही, नैराश्यात १७ वर्षीय विद्यार्थ्यानं जीवन संपवलं; घरच्यांना शेवटचा मेसेज पाठवत...

Marathi News Live Updates : जरांगे पाटील यांनी आंदोलन स्थगित करावं- प्रसाद लाड

Education Institution Corruption: शिक्षण संस्थेत भ्रष्टाचाराचे आरोप, तपास समिती चौकशीला आली असतानाच प्राध्यापकाचा संशयास्पद मृत्यू; काय घडलं?

SCROLL FOR NEXT