Pink E-Rickshaw sakal
छत्रपती संभाजीनगर

Pink E-Rickshaw : पिंक ई-रिक्षाचा घेता येईल महिलांना लाभ; 70 टक्के कर्ज बँकांकडून उपलब्ध करून देणार

गरजू महिला व युवतींना रोजगारासाठी पिंक (गुलाबी) ई-रिक्षा घेण्यासाठी जिल्हा महिला बालविकास विभागाने इच्छुक युवती व महिलांकडून अर्ज मागविले आहेत. लाभार्थींची निवड जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली गठित समितीकडून होईल.

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : गरजू महिला व युवतींना रोजगारासाठी पिंक (गुलाबी) ई-रिक्षा घेण्यासाठी जिल्हा महिला बालविकास विभागाने इच्छुक युवती व महिलांकडून अर्ज मागविले आहेत. लाभार्थींची निवड जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली गठित समितीकडून होईल. ७० टक्के कर्ज बँकांकडून उपलब्ध करून देण्यात येईल.

ई-रिक्षासाठी राज्य शासनातर्फे २० टक्के आणि १० टक्के रक्कम याप्रमाणे योजनेचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल. ही योजना २० ते ४० वयोगटांतील गरजू महिलांसाठी असून, लाभार्थींना ऑनलाइन अर्ज करावा लागेल.

यासाठी अर्जदार महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ३ लाखांपेक्षा जास्त नसावे. ई-रिक्षाच्या किमतीमध्ये सर्व करांचा समावेश असेल. नागरी सहकारी बँका/जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक/राष्ट्रीयीकृत बँका किंवा खासगी बँकांकडून ई-रिक्षा किमतीच्या ७० टक्के कर्ज उपलब्ध करून दिले जाईल.

कर्जाची परतफेड ५ वर्षांत करावी लागेल. या योजनेअंतर्गत एकदाच लाभ घेता येईल. इच्छुक महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रभारी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी शिवाजी वने यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा महिला बालविकास अधिकारी, खोकडपुरा इथे संपर्क साधावा.

लाभार्थींची पात्रता

  • योजनेसाठी महिलेचे कुटुंब राज्याचे रहिवासी असणे आवश्यक

  • कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ३ लाख रुपयांपेक्षा अधिक नसावे

  • महिलेकडे वाहनचालक परवाना असणे आवश्यक

  • विधवा, घटस्फोटित, महिला राज्यगृहातील इच्छुक प्रवेशित

  • अनाथ प्रमाणपत्र प्राप्त, अनुरक्षणगृह/बालगृहातील प्रवेशितांना प्राधान्य

  • दारिद्र्यरेषेखालील महिलांनाही प्राधान्य दिले जाईल

आवश्यक कागदपत्रे

  • योजनेचा ऑनलाइन अर्ज.

  • आधार कार्ड, पॅन कार्ड.

  • अधिवास प्रमाणपत्र.

  • उत्पन्नाचा दाखला.

  • बॅंक खाते पासबुक.

  • पासपोर्ट आकाराचे छायाचित्र, मतदार ओळखपत्र, रेशन कार्ड, चालक परवाना

  • रिक्षा ही महिलाच चालवेल, याबाबतचे हमीपत्र व अटी-शर्ती पालनाचे हमीपत्र.

  • लाभार्थीस प्रशिक्षण देणे व वाहनचालक परवाना (Driving Licence) व पीएसव्हीए बिल्ला (PSVA Badge) मिळण्यासाठी निवड झालेल्या एजन्सीने साह्य करणे बंधनकारक असेल.

पिंक ई-रिक्षासाठी वयोगटाची अट पूर्वी १८ ते ३५ होती. ती आता २० ते ४० अशी करण्यात आली आहे. अंगणवाडी सेविका, माविमच्या बचत गटांच्या अर्जाचा नमुना उपलब्ध असून, जिल्हा महिला बालविकास विभागाच्या कार्यालयात अर्ज उपलब्ध आहे. अजूनपर्यंत या योजनेसाठी जिल्ह्यात अर्ज आलेले नाहीत.

- रेश्मा चिमंद्रे, जिल्हा महिला बालविकास अधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT