शेळगावच्या महिलांची उद्योगक्षेत्रात भरारी
‘स्वप्नस्फूर्ती’ चा ५१.८८ लाखांचा धान्य स्वच्छता-प्रतवारी प्रकल्प
सोनपेठ, ता.३ (बातमीदार) : बचत गटांच्या माध्यमातून सुरू झालेल्या महिला सक्षमीकरणाच्या चळवळीने आता उद्योगक्षेत्रातही भरारी घेतली आहे. शेळगाव येथील स्वप्नस्फूर्ती महिला शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून धान्य स्वच्छता व प्रतवारीचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभारण्यात येत असून, ५१ लाख ८८ हजार रुपयांच्या या प्रकल्पामुळे परिसरातील महिलांना कृषी व्यवसायाचे नवे दालन खुले होणार आहे.
कंपनीची सर्वसाधारण सभा अनघा गोरवे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी तालुका अभियान व्यवस्थापक बाबासाहेब हिरवे, प्रभाग समन्वयक अंकुश रसाळ, प्रभागातील ग्रामसखी आणि कंपनीच्या २१४ महिला सभासदांची उपस्थिती होती. हा प्रकल्प कृषी विभागांतर्गत मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प अंतर्गत मंजूर झाला आहे. धान्य स्वच्छता आणि प्रतवारी उपप्रकल्प म्हणून त्याची उभारणी केली जाणार आहे. प्रकल्पाच्या माध्यमातून धान्याची स्वच्छता, प्रतवारी आणि बाजारपेठेसाठी आवश्यक प्राथमिक प्रक्रिया कंपनीच्या स्तरावर करता येणार आहे.
--------------
३१.१३ लाखांचे अनुदान
एकूण ५१.८८ लाख रुपयांच्या प्रकल्पासाठी ६० टक्के म्हणजे ३१.१३ लाख रुपये अनुदान, ३० टक्के म्हणजे १५.५६ लाख रुपये बँक कर्ज, तर १० टक्के म्हणजे ५.१९ लाख रुपये कंपनीचा स्वहिस्सा राहणार आहे. या प्रकल्पामध्ये २१.७५ लाख रुपयांचे शेड बांधकाम, २७.९८ लाख रुपयांची मशिनरी, १.४४ लाख रुपयांचे डीपी काम आणि ७१ हजार रुपयांचा इतर साहित्य खर्च करण्यात येणार आहे.
-------------
तालुक्यातील पहिलाच प्रकल्प
धान्य स्वच्छता व प्रतवारीचा हा प्रकल्प सोनपेठ तालुक्यातील पहिलाच प्रकल्प असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे शेळगावच्या महिला शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून ग्रामीण महिलांना शेतीमालाच्या प्रक्रियेतून मूल्यवर्धन करण्याची संधी मिळणार आहे. शेतमालाची गुणवत्ता वाढविण्यासोबतच त्याला योग्य बाजारपेठ उपलब्ध करून देणे, महिलांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करणे आणि महिला शेतकऱ्यांना कृषी व्यवसायाच्या मुख्य प्रवाहात आणणे, या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे.
--------------
प्रकल्पाची ठळक आकडेवारी :
एकूण किंमत : ५१.८८ लाख रुपये, अनुदान : ३१.१३ लाख, कर्ज : १५.५६ लाख, स्वहिस्सा : ५.१९ लाख, महिला सभासद संख्या : २१४
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.