छत्रपती संभाजीनगर

बीडच्या सव्वादोन लाख महिलांना शेतकरी ओळख

CD
बीडच्या सव्वादोन लाख महिला ठरल्या ‘अधिकृत शेतकरी’ सकाळ वृत्तसेवा बीड, ता. १७ ः शेतात रात्रंदिवस राबून आणि पशुपालनात मोठा वाटा उचलूनही, केवळ सातबारा नावावर नसल्याने बीड जिल्ह्यातील अनेक महिला शासकीय योजनांपासून वंचित राहत होत्या. मात्र, आता या महिलांना हक्काची आणि कायदेशीर ओळख मिळाली आहे. राज्य शासनाच्या ‘महिला शेतकरी प्रमाणपत्र’ योजनेला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, तब्बल २ लाख १२ हजार ५३४ महिलांनी या प्रमाणपत्रासाठी यशस्वी नोंदणी केली आहे. या लक्षणीय सहभागामुळे नोंदणीत बीड जिल्ह्याने मराठवाड्यात तिसरा, तर संपूर्ण राज्यात बारावा क्रमांक पटकावला आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने घोषित केलेल्या आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्षाच्या पार्श्वभूमीवर, राज्य शासनाने महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम, २०२६ संमत केला. या कायद्यामुळे स्वतःच्या नावे जमीन नसलेल्या महिलांनाही आता स्वतंत्र महिला शेतकरी म्हणून प्रमाणपत्र दिले जात आहे. ----- महिलांना मिळणार थेट लाभ महिला शेतकरी प्रमाणपत्रामुळे आता जिल्ह्यातील पात्र महिलांसाठी संस्थात्मक कृषी कर्ज, पीककर्ज आणि पीकविमा मिळवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तसेच, बियाणे, खते आणि कृषी विभागाच्या विविध शासकीय योजनांचा थेट लाभ या महिलांना घेता येणार आहे. या निर्णयामुळे महिलांचे खऱ्या अर्थाने सक्षमीकरण होण्यास मोठी मदत होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

School Admission: मोठी बातमी! नर्सरी-केजी प्रवेशावेळी डोनेशन मागितल्यास शाळांवर कारवाई; मुलाखती अन् चाचण्याही बंद; वाचा नवे नियम

MS Dhoni Retire: महेंद्रसिंग धोनीने त्याचा निवृत्तीचा निर्णय CSK ला केव्हा आणि कसा कळवला? म्हणाला, माझं नाव त्यात लिहा...

Amazon: ॲमेझॉनची भारतात 7 अब्ज डॉलरच्या गुंतवणुकीची योजना; 2030 पर्यंत चार सौर आणि पवनऊर्जा प्रकल्प उभारणार

उद्या ५ राशींच्या आयुष्यात होणार महत्त्वाचे बदल; आर्थिक निर्णय घेताना सावध राहा!

Success Story: ऑफिसवेअरच्या शोधात सुरू झाला स्वतःचा ब्रँड; नागपूरच्या तरुणीने साडेपाच महिन्यांत १४ लाखांची विक्री! वाचा प्रेरणादायी कहाणी

SCROLL FOR NEXT