छत्रपती संभाजीनगर

मुलींनी आत्मविश्वासाने ध्येय गाठावे : भोसले

CD
रा. प. महाविद्यालयात कायदेविषयक शिबिर धाराशिव, ता. ७ : समाजात वावरताना अजिबात भीती न बाळगता आत्मविश्वासाने जगत आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करावे, असा सल्ला उपविभागीय पोलिस अधिकारी अश्विनी भोसले यांनी विद्यार्थिनींना दिला. येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाचा महिला सक्षमीकरण, अंतर्गत तक्रार निवारण विभाग आणि धाराशिव शहर पिंक पथकातर्फे पोलिस अधीक्षक कार्यालयात कायदेविषयक जागृती शिबिर घेण्यात आले. पोलिस निरीक्षक इक्बाल सय्यद, सय्यद यांनी पोलिस नियंत्रण कक्ष, भरोसा सेल, अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग युनिट, आर्थिक गुन्हे शाखा, स्थानिक गुन्हे शाखा आणि पिंक पथक यांच्या कार्यपद्धतीबाबत विद्यार्थिनींना माहिती दिली. त्याचप्रमाणे महिलांच्या सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाच्या ठरणाऱ्या ‘११२’ या आपत्कालीन हेल्पलाइनबाबत संदीप सुरवसे यांनी मार्गदर्शन केले. मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेच्या कामकाजाविषयी सुनील सोनटक्के यांनी, तर आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्याबाबत सहायक पोलिस निरीक्षक देशमुख यांनी माहिती दिली. सध्याच्या डिजिटल युगात महिलांच्या सुरक्षिततेसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या सायबर सेलबाबतही यावेळी सांगण्यात आले. प्राचार्य डॉ. अंबादास मंजुळकर यांच्या मार्गदर्शनाखाली महिला सक्षमीकरण विभाग प्रमुख डॉ. स्वाती जाधव, डॉ. सी. आर. दापके, सहसमन्वयक शिल्पा डोळे, सुधीर तुगावकर, श्रीशैल कट्टे, बी. डी. मडावी, प्रा. शीतल शिंदे, मेघा अंगारखे, डॉ. शीतल गायकवाड, डॉ. वैशाली बोबडे, प्रा. सुवर्णा गेंगजे, सुवर्णा वाघमारे आदींनी पुढाकार घेतला. ...... धाराशिव ः पोलिस अधीक्षक कार्यालयात कायदेविषयक जागृती शिबिरादरम्यान उपस्थित आर. पी. काॅलेजमधील विद्यार्थी आणि पोलिस अधिकारी. ... फोटो क्रमांक ःOSM26B06925

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Punjab Elections: पश्चिम बंगालच्या धर्तीवर भाजपची पंजाबमध्ये रणनीती! 'आप'ला हद्दपार करण्यासाठी 'हा' मुद्दा केंद्रस्थानी

कोण आहेत IAS नेहा? ५० दिवसांत बदली, वर्षभरात ४ वेळा ट्रान्सफर होताच संतापल्या

महिन्याभरापूर्वी घेतली महागडी गाडी; एका महिन्याला किती कमावते तेजश्री प्रधान? किती आहे एकूण संपत्ती?

Horoscope: ‘या’ ४ राशींच्या लोकांच्या हातात पैसा टिकतच नाही! नको तिथे खर्च करून गरजेच्या वेळी होतात कंगाल, आर्थिक सवय ठरते डोकेदुखी

Marathi News Live Updates: गणवेश जबाबदारीची जाणीव करुन देतो- पोलिस महासंचालक सदानंद दाते

SCROLL FOR NEXT