छत्रपती संभाजीनगर

मोदकांच्या गोडव्यात पाककलेला व्यासपीठ

CD
((((फोटो ः ओव्हरसेट)))) ---- (((सीमा गोंटला ः ABD२६J७९३४६))) (((शिनंदा माळगे ः ABD२६J७९३४७))) (((आरती कोळकर ः ABD२६J७९३४८))) --- ABD२६J७९३४९ (((फोटो ओळ))) देवळाई : लंबोदर सोसायटीमध्ये ‘सकाळ’तर्फे घेण्यात आलेल्या स्पर्धेत सहभागी महिला. -- मोदकांच्या गोडव्यात पाककलेला व्यासपीठ -- ‘सकाळ’तर्फे बीड बायपास परिसरातील लंबोदर सोसायटीमध्ये स्पर्धा -- देवळाई, ता. १५ : गणरायाच्या आगमनाने घरोघरी आनंदाचे वातावरण आहे. घराघरांत मोदकांचा सुगंध दरवळत असून, सणाच्या आनंदाला गोडवा लाभत आहे. या पारंपरिक गोडव्याला स्पर्धेची रंगत आणि महिलांच्या सर्जनशीलतेची जोड मिळाली. ‘सकाळ’तर्फे बीड बायपास परिसरातील लंबोदर सोसायटीमध्ये मोदक स्पर्धा पार पडली. विविध प्रकारचे मोदक तयार करून महिलांनी यामध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. परीक्षण शेफ राजश्री अग्रवाल यांनी केले. या स्पर्धेत सीमा गोंटला यांनी प्रथम क्रमांक पटकावला. शिनंदा माळगे यांनी द्वितीय, तर आरती कोळकर यांनी तृतीय क्रमांक मिळवला. मीना कुलकर्णी, सोनाली माळी, मनीषा जोशी, प्रज्ञा गोसावी आणि अमृता बकरे यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. विजेत्या तसेच उत्तेजनार्थ पारितोषिक मिळवणाऱ्या महिलांना ‘मलाबार गोल्ड’तर्फे भेटवस्तू देण्यात आल्या. मातृका वूमन हॉस्पिटलचे पीआरओ दिनेश राठोड आणि गणेश हूड यांच्या वतीने स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व महिलांना गणपतीच्या फ्रेम भेट म्हणून देण्यात आल्या. -- तुम्हीही घेऊ शकता स्पर्धेत भाग ही स्पर्धा १८ वर्षांवरील तरुणी आणि महिलांसाठी आहे. ती तुमच्या गृहनिर्माण सोसायटीच्या प्रांगणात अथवा तेथे उपलब्ध असलेल्या हॉलमध्ये आयोजित केली जाईल. सोसायटीतील महिलांनी यात सहभाग घ्यायचा आहे. त्यासाठी पूर्वनोंदणी करणे आवश्यक आहे. आपण तयार केलेल्या मोदकांचे परीक्षण करण्यासाठी परीक्षक तेथे उपस्थित राहतील. प्रथम, द्वितीय, तृतीय आणि उत्तेजनार्थ असे बक्षिसांचे स्वरूप आहे. शिवाय विजेत्यांना ‘सकाळ’च्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे मोफत पास दिले जाणार आहेत. या स्पर्धेच्या आयोजनासाठी ७४१००३०२४५, ७४१००३०२४६ किंवा ८७८८००८३८० या क्रमांकांवर संपर्क साधावा. ---- (((कोट))) ‘सकाळ’ने घेतलेल्या या स्पर्धेमुळे महिलांना एक नवीन व्यासपीठ मिळाले आहे. महिलांच्या कलागुणांना प्रोत्साहन देणाऱ्या अशा स्पर्धा नेहमी आयोजित केल्या जाव्यात. - मनीषा जोशी, सदस्य, लंबोदर सोसायटी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राष्ट्रपतींचे माजी ADC मेजर ऋषभ सिंह संब्याल यांनी घेतली ३०व्या वर्षी निवृत्ती; १२ वर्षांच्या सेवेनंतर किती पेन्शन मिळणार?

ZIM vs AUS : सचिन तेंडुलकरचा 'तो' विक्रम, आता त्याचा राहीला नाही! झिम्बाब्वेच्या ब्रेंडन टेलरचा वन डे क्रिकेटमध्ये मोठा पराक्रम

US Student Visa Update: भारतीय विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांच्या चार वर्षांच्या व्हिसा नियमांना स्थगिती

Pakistan Cricket : पाकिस्तानात शाहिद आफ्रिदीच्या नावावरून पसरलीय अफवा; नेमकं काय घडलं?

कोकणात मध्यरात्री बाप्पाची ‘चोरी’ होते? दारात गणपती ठेवून फटाके फोडण्यामागचं कारण ऐकून व्हाल भावूक!

SCROLL FOR NEXT