crime  esakal
छत्रपती संभाजीनगर

धक्कादायक! पतीचं निधन; तेराव्याच्या दिवशीच पत्नीवर राहत्या घरी दीराकडून बलात्कार | Paithan Crime

पतीच्या निधनानंतरही जीवाची होरपळ होत राहिली

सकाळ डिजिटल टीम

पैठण : पतीच्या निधनानंतर अवघ्या तेराव्याच दिवशी पत्नीच्या वाट्याला छळ आल्याची घटना पैठण तालुक्यातील दावरवाडी येथे घडली आहे. तेरावाच्या विधीचा कार्यक्रम आवरल्यानंतर ही घटना घडली असून याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दावरवाडी येथील एका महिलेच्या पतीच्या निधनानंतर त्याच्या तेराव्याचा कार्यक्रम आवरला होता. त्यानंतर आरामासाठी मृत व्यक्तीची पत्नी आपल्या चुलत सासूच्या घरी आरामासाठी थांबली होती. त्यावेळी महिलेच्या चुलत दीराने घरी कोणी नसल्याचा गैरफायदा घेत तिच्यावर बलात्कार केला.

दरम्यान, महिलेने नकार देऊनही बळजबरीने चुलत दीराने बलात्कार केल्याने सदर महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला असून अधिकचा तपास सुरू असल्याचं सांगितलं आहे.

पण, पतीच्या निधनानंतर अवघ्या तेराव्या दिवशी पत्नीवर हा प्रसंग ओढावल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jintur Agitation : जिंतूरात बंजारा आंदोलनाला हिंसक वळण; उपोषणकर्ते विनोद आडे यांचा आत्मदहनाचा प्रयत्न, वाहनांची तोडफोड, रास्ता रोकोने शहरात खळबळ

Marathi News Live Updates: राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय, ५ दिवस पावसाचा अंदाज

Nirgudsar News : कृषीपंपांच्या केबलवर चोरट्यांचा डल्ला

Junnar News : जुन्नर शहरात श्री तुळजाभवानी माता पलंगाच्या दर्शनासाठी भाविकांची मांदियाळी

FOREIGN JOB OPPORTUNITIES: या राशींच्या लोकांना मिळू शकते परदेशात जाण्याची संधी; करिअर आणि पैशांसाठी ठरू शकतो मोठा टर्निंग पॉइंट

SCROLL FOR NEXT