छत्रपती संभाजीनगर

कंचली तांडा येथे एकाच कारागिराने घडवलेले अनोखे लाकडी गणपती

CD
((अँकर))) --- ABD26J79623 चिखली ई. येथील लाकडी गणेशमूर्ती. ABD26J79622 कंचली तांडा येथील लाकडी गणेशमूर्ती. ---- चिखली, कंचली तांडा येथे लाकडी गणपती --- गणेशोत्सवात भाविकांची दर्शनासाठी गर्दी, एकाच कारागिराने घडविल्या मूर्ती ---- शिवणी, ता. १७ (बातमीदार) : किनवट तालुक्यातील सीमाभागातील दोन गावांमधील अनोख्या लाकडी गणपतीची सध्या संपूर्ण तालुक्यात जोरदार चर्चा सुरू आहे. ६३ वर्षांची ऐतिहासिक परंपरा असलेला चिखली (ई.) चा लाकडी गणपती आणि दुसरा आहे चिखलीपासून अवघ्या ५ किलोमीटर अंतरावर असलेल्या कंचली तांडा येथील ‘कंचलीचा राजा’. हे दोन्ही गणपती एकाच कारागिराने एकाच लाकडापासून घडवलेले आहेत.तेलंगणा सीमेवरील चिखली (ई.) गावाची लोकसंख्या जवळपास ७०० आहे. येथे १९५९ साली गणपतीची स्थापना करण्यात आली. त्यावेळी गावातील दिवंगत बक्कन्ना झरीवाड, किशन झरीवाड, विठ्ठल झरीवाड, पोषत्ती रुईवाड यांनी पुढाकार घेऊन प्रत्येकी ९० रुपये वर्गणी जमा केली होती. निर्मल (तेलंगणा) येथील प्रसिद्ध कारागीर गुंडप्पा सुतार यांनी झाडाच्या खोडावर आकर्षक कोरीव काम करून ही मूर्ती घडवली. पाळज येथील गणपती मूर्तीही याच कारागिरांनी बनवल्याचे ज्येष्ठ नागरिकांकडून सांगण्यात आले. गेल्या ६३ वर्षांपासून येथे ‘एक गाव एक गणपती’ ही परंपरा कायम आहे. विसर्जनाच्या दिवशी मुख्य लाकडी मूर्ती शेजारी ठेवलेल्या लहान मूर्तीचे विसर्जन केले जाते, तर मुख्य लाकडी मूर्ती पेटीत बंद करून सुरक्षित ठेवली जाते व पुढील वर्षी पुन्हा तिचीच प्रतिष्ठापना केली जाते. येथे दिवाळी-दसऱ्यापेक्षा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो. या वर्षी गणेशोत्सवानिमित्त गावकऱ्यांकडून सर्व भाविकांसाठी अकराही दिवस महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. ---- चौकट कंचली तांडा येथील ‘कंचलीचा राजा’ चिखलीपासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या कंचली तांडा येथेही अशाच प्रकारचा अनोखा लाकडी गणपती आहे. या गणरायाची स्थापना वर्ष २०११ मध्ये करण्यात आली. हा गणरायादेखील एकाच लाकडापासून, झाडाच्या खोडावर कोरीव काम करून साकारण्यात आला असून, तो चिखलीच्या गणपतीप्रमाणेच प्रसिद्ध कारागीर गुंडप्पा सुतार यांच्याच हातून घडला आहे. या गणरायाला ‘कंचलीचा राजा’ नावाने ओळखले जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ESIC New Rules 2026 : कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! आजारपण आणि प्रसूती लाभांसाठी अर्जाची गरज नाही; पैसे थेट बँक खात्यात जमा होणार

Gadchiroli History: गडचिरोलीच्या घनदाट जंगलात इतिहासाचा खजिना! १६व्या-१७व्या शतकातील ५० वीरगळांचा शोध, शूरवीरांच्या पराक्रमाची शिल्पे उजेडात

IND A vs PAK A: भारत पाकिस्तान सामन्यात टॉसवेळी नेमकं काय घडलं? होत, मॅच रेफ्रींच्या चुकीमुळे वाद, पाकिस्तानी चाहत्यांनी केले आरोप

Water Security 2051 : पुणे महानगर प्रदेशाच्या पाणीपुरवठ्याचे दीर्घकालीन नियोजन; जलसंपदा विभागाचा २०५१ पर्यंतचा जलसुरक्षा आराखडा तयार होणार

Palodwadi Robbery: पालोदवाडीत चार चोरट्यांचा धुमाकूळ; चार घरांवर दरोडा, महिलांच्या गळ्याला चाकू लावून ३.३२ लाखांचा ऐवज लुटला

SCROLL FOR NEXT