Aurangabad News esakal
छत्रपती संभाजीनगर

गंगापूरमध्ये यंत्रावर काम करताना विजेचा शाॅक लागून कामगाराचा मृत्यू

कायगाव पेपर मिल्समध्ये गेल्या तीन वर्षांपासून हेल्पर म्हणून काम करीत होता.

जमील पठाण

कायगाव (जि.औरंगाबाद) : कायगाव (ता.गंगापूर) (Aurangabad) येथील कायगाव पेपर मिल्समध्ये काम करताना एका कामगाराचा विजेचा शॉक लागून मृत्यु झाल्याची घटना बुधवारी (ता.आठ) पहाटे दीड वाजे दरम्यान घडली. गंगापूर पोलिसाकडून मिळालेल्या माहितीनुसार समाधान अंकुश पठाडे (वय २१, रा. बोधेगाव, ता.नेवासा, जि.अहमदनगर) (Ahmednagar)हे कायगाव येथील कायगाव पेपर मिल्समध्ये (Kaygaon Paper Mills) गेल्या तीन वर्षांपासून हेल्पर म्हणून काम करीत होता. तो रात्री आठ ते सकाळी आठ वाजेपर्यन्त कामावर होता. मशीनवर काम करत असतानाच बुधवारी पहाटे दीड वाजता मशीनवर काम करत असताना त्याला विजेचा शॉक लागला. (Gangapur)

कायगाव पेपर मिल्समधील कामगारांनी समाधान यास गंगापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात आणले असता येथील डॉक्टर यांनी तपासून त्यास मृत घोषित केले. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले. मृत समाधान पठाडे पश्चात आई, वडील आणि भाऊ असा परिवार आहे. या प्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल विजय भिल्ल करित आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पहिला गुन्हा दाखल झाल्यानंतर काय होती राज ठाकरेंची प्रतिक्रिया? अमित ठाकरेंनी भूमिका स्पष्ट करत सगळंच सांगितलं...

२४ तासात आरोपी ताब्यात! बाहेरच्या टॅक्सी चालकाला लोणावळ्यात मारहाण; सोशल मीडियात व्हिडीओ व्हायरल

Kolhapur news: मुदाळतिट्टा चौकात वाहतूक कोंडीचा महापूर! वाहनांच्या लांबच लांब रांगा आणि प्रवाशांचा त्रास शिगेला

Shrikant Shinde: शिवसेनेला शक्ती प्रदर्शनाची गरज नाही, अंबरनाथमध्ये भगवा ठाम; श्रीकांत शिंदेंनी स्पष्टचं सांगितलं

शुभमन गिलचं साराशी लग्न कधी? चाहत्याने थेट वडिलांनाच विचारला प्रश्न, Video तुफान व्हायरल

SCROLL FOR NEXT