घरवापसी घरवापसी
छत्रपती संभाजीनगर

कामगारांनी धरली गावाकडची वाट, अनेक इमारती ओस

सद्या कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन पाळला जात असल्याने अनेकांच्या रोजगारीवर परिणाम जाणवू लागला आहे

नवनाथ इधाटे

फुलंब्री (औरंगाबाद): संपूर्ण जग कोरोना महामारीच्या (covid 19) संकटातून जात असून भारतातही त्याचा विशेष करून महाराष्ट्रातील महानगरात व ग्रामीण भागात त्याचा जास्त प्रभाव (corona impact) दिसून येत आहे. गावखेड्यातून कामानिमित्त किंवा नोकरीनिमित्त शहरात गेलेल्यांची मोठी पंचाईत झाली आहे. लॉकडाउनमुळे हाताला काम नसल्याने भाडेतत्वावर राहणारा हा वर्ग घराकडे परतला असल्याने फुलंब्री (fulambri) शहरात अनेक इमारती किरायादारांअभावी ओस पडल्या आहेत. शहरातील घरमालकांनी भाड्याचे दोन पैसे मिळावे, यासाठी बांधकामात पैसा खर्च केला. मात्र, भाडेकरूच रुम सोडून गेल्याने घरमालकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे.

सद्या कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन पाळला जात असल्याने अनेकांच्या रोजगारीवर परिणाम जाणवू लागला आहे. शहरातील मजुरांचे गावाकडे स्थलांतर होत असल्याने अनेक शहरे आज रोजी ओस पडली आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून गावात काम मिळत नसल्याने अनेकांनी आपल्या पोटापाण्यासाठी शहराचा मार्ग निवडला असल्याचे आतापर्यंत पहावयास मिळाले आहे. परंतु यावर्षी पहिल्यांदाच कोरोना विषाणूंने शहरात थैमान घातल्याने या वर्गावर उपासमारीची वेळ आली आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर हातावर पोट असणाऱ्या तसेच विविध कंपनीत तसेच इतर खाजगी ठिकाणी काम करुन रोजीरोटी कमाविणाऱ्यांनी आता आपल्या गावचा रस्ता धरला आहे. दोन पैसे कमवून भाड्याच्या खोलीत संसाराचा गाडा हाकणारा हा वर्ग घराकडे परतल्याने ते राहत असलेल्या खोल्या आज रोजी ओस पडल्या आहेत. त्यामुळे साहजिकच घरमालकांनी मोठी इन्व्हेस्टमेंट करून ठेवलेल्या या खोल्या ओस पडल्याने नुकसान होत आहे.

सर्वांचीच घरवापसी
शालेय विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी किंवा रोजगार व व्यवसायानिमित्त खेडेगावातून बाहेर पडलेल्यांनीही घरवापसी केल्याने जिल्हा व तालुका स्तरावरील अनेक भाड्याची घरे रिकामी झाली आहे. सद्या शाळा, महाविद्यालयांना सुट्टी असल्याने विद्यार्थ्यांसोबतच गुरुजीही आपआपल्या घराकडे परतले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant : ‘कोर्टाची दारे सर्वांसाठी खुली’: इंडिया आघाडीच्या नेत्यांना भेटीस नकार देत सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे स्पष्टीकरण

Gold Price Today: दसऱ्याआधी सोन्याचे भाव घसरले! ग्राहकांना मोठा दिलासा; आजचे 22, 24 कॅरेटचे दर पाहा

मृत्यू घासून गेला ! भरधाव कारने बाईकला उडवले... तरुण अलगद रस्त्यावर पडला, साधं खरचटलंही नाही, CCTV 13 second Video Viral

Nagpur News: तिसरा रिंगरोड ठरणार प्रगतीचा महाकॉरिडॉर!; १०७ गावांतून जाणार १४९ किमी मार्ग; रस्ता, मेट्रो अन् टाऊनशिपचे नियोजन

Kolhapur Gokul Election Latest News : 'काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांवर दगड मारू नयेत'; मुख्‍यमंत्र्यांवर आरोप करणाऱ्या सतेज पाटलांना चंद्रकांतदादांचा इशारा

SCROLL FOR NEXT