विश्वबंधुत्व पंधरवडा’ साजरा
करण्याचे ‘अमृत’चे आवाहन
‘शिकागो भाषण कृती कार्यक्रम’ ठरणार प्रमुख आकर्षण
परभणी, ता. १३ : स्वामी विवेकानंद यांनी ११ सप्टेंबर १८९३ रोजी अमेरिकेतील शिकागो येथे जागतिक धर्म संसदेत केलेल्या ऐतिहासिक भाषणातून दिलेला सर्वधर्मसमभाव, सहिष्णुता, मानवता, परस्पर सन्मान आणि विश्वबंधुत्वाचा संदेश समाजाच्या विविध घटकांपर्यंत व्यापक स्वरूपात पोहोचविण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्यावतीने यावर्षीपासून ११ ते २६ सप्टेंबरदरम्यान विश्वबंधुत्व पंधरवडा साजरा करण्यात येणार आहे. त्यामुळे या पंधरवड्यात विविध संस्थांनी सहभागी होण्याचे आवाहन अमृत संस्थेने केले आहे.
शिकागो भाषण कृती कार्यक्रम हे या पंधरवड्याचे प्रमुख आकर्षण असून, स्वामी विवेकानंद यांच्या शिकागो भाषणातील विचार समजून घेऊन ते दैनंदिन जीवनात आचरणात आणण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. सहभागी संस्थांनी आपल्या स्तरावर स्पर्धा, चर्चासत्रे, व्याख्याने, जनजागृतीपर उपक्रम तसेच मूल्याधिष्ठित कार्यक्रम आयोजित करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. या अभियानात शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे, शैक्षणिक संस्था, सामाजिक व स्वयंसेवी संस्था, शासकीय व निमशासकीय कार्यालये तसेच विविध खासगी आस्थापनांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन अमृतने केले आहे. प्रत्येक संस्थेने आपल्या कार्यक्षेत्रानुसार उपक्रम आयोजित करून विद्यार्थी, युवक आणि नागरिकांचा जास्तीत जास्त सहभाग वाढवावा, अशी अपेक्षा आहे. या अभियानात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या संस्थांनी (https://vbd.mahaamrut.org.in/) या पोर्टलवर ऑनलाइन नोंदणी करावी. नोंदणी केलेल्या संस्थांनी आपल्या स्तरावर ‘शिकागो भाषण कृती कार्यक्रम’अंतर्गत विविध उपक्रम आयोजित करावेत, असे आवाहन अमृत संस्थेने केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.