छत्रपती संभाजीनगर

‘वर्ल्ड सिनेमा’चा पहिला पुरस्कार सोहळा उत्साहात

CD
फोटो- वर्ल्ड सिनेमा ABD26J78826 छत्रपती संभाजीनगर ः ‘वर्ल्ड सिनेमा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलच्या पुरस्कार सोहळ्यातील विजेते कलाकार. -- ‘वर्ल्ड सिनेमा’चा पहिला पुरस्कार सोहळा उत्साहात छत्रपती संभाजीनगर, ता. ७ ः विविध देशांतील आणि भाषांमधील चित्रपट, लघुपट, माहितीपट व संगीत व्हिडिओ कलाकृतींना आंतरराष्ट्रीय व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या ‘वर्ल्ड सिनेमा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलचा पहिला पुरस्कार सोहळा’ रविवारी (ता. सहा) मौलाना आझाद रिसर्च सेंटर टीव्ही सेंटर येथे पार पडला. फिल्म एज्युकेशन ॲण्ड वेल्फेअर फाउंडेशनच्या वतीने आयोजित या सोहळ्यास अभिनेता संजय बनसोडे, जलसंपदा विभागातील सहायक कक्ष अधिकारी रवींद्र बोर्डे, कवी-गीतकार पाशा खान, सीमा खान, निर्माता रघुनाथ साळवे, अनिता साळवे, राजू कांबळे, अब्दुल्ला आजलानी, उमेश निकाळजे आदींची उपस्थिती होती. यावेळी तुषार थोरात, लक्ष्मी थोरात, सुशांत पाटील, सागर जाधव व पोपट थोरात यांनी आयोजन केले होते. महोत्सवात विविध देशांतून सहभागी झालेल्या कलाकृतींचे परीक्षण करून दिग्दर्शक, निर्माता, सहनिर्माता, पटकथा लेखक, कलाकार, छायाचित्रकार, संगीतकार, गायक, संपादक तसेच तांत्रिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. आयोजक तुषार थोरात यांनी जागतिक स्तरावरील चित्रपटांना एकत्र आणतानाच नवोदित कलावंतांना आंतरराष्ट्रीय व्यासपीठ मिळवून देणे हा महोत्सवाचा उद्देश असल्याचे सांगितले. सूत्रसंचालन महेश माने व गौरी गोजे यांनी केले. -----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant: देशाच्या सरन्यायाधीशांनी घेतली बीडच्या रमाबाईंची दखल; लेकीच्या शिक्षणासाठी धावणाऱ्या महिलेला भरीव मदत

Pune News : विनापरवाना लावणीचा कार्यक्रम; मंडळाच्या अध्यक्षांसह नृत्यांगना राधा पाटील यांच्यावर गुन्हा दाखल

Social Media: 'Likes' मुळे वाढतोय मानसिक ताण? Post's च्या मोहात अडकतात डिप्रेशनग्रस्त लोक; संशोधनातून धक्कादायक खुलासा!

Marathi News Live Updates: तळेगाव ढमढेरे परिसरात विजेमुळे ग्रामस्थ त्रस्त

आई म्हणाली ‘चॉकलेट बंद कर’; स्क्वॉशपटू अनाहतने थेट न्यूट्रिशनिस्टलाच फोन केला! नेमकं काय घडलं? Viral Video

SCROLL FOR NEXT