अंड्यांतील पोषक घटकांची विद्यार्थ्यांना करून दिली जाणीव
-----
जागतिक अंडी दिनानिमित्त सोमठाणा शाळेत पशुसंवर्धन विभागाचा जनजागृती उपक्रम
---
सकाळ वृत्तसेवा
नांदेड, ता. १३ : विद्यार्थ्यांचा शारीरिक व बौद्धिक विकास साधण्यासाठी पौष्टिक आहाराचे महत्त्व पटवून देण्याच्या उद्देशाने जागतिक अंडी दिनानिमित्त भोकर तालुक्यातील सोमठाणा येथील जिल्हा परिषद शाळेत पशुसंवर्धन विभागाच्या वतीने जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना अंड्यातील पोषक घटक, त्याचे आरोग्यदायी फायदे आणि संतुलित आहाराचे महत्त्व समजावून सांगण्यात आले.
जागतिक अंडी दिन दरवर्षी ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या शुक्रवारी साजरा केला जातो. अंड्याचे आहारातील महत्त्व आणि त्यातील पोषक घटकांविषयी जनजागृती करणे हा या उपक्रमाचा उद्देश होता. अंड्यामध्ये उच्च दर्जाची प्रथिने, जीवनसत्त्वे आणि विविध खनिजे असतात. वाढत्या वयातील मुलांची शारीरिक वाढ, स्नायूंचा विकास आणि मेंदूच्या कार्यासाठी संतुलित व पौष्टिक आहार आवश्यक असल्याचे यावेळी सांगण्यात आले. अंडी योग्य प्रकारे शिजवून खाणे, अन्नाची स्वच्छता राखणे आणि सुरक्षित अन्नसेवनाच्या सवयी जोपासणे याबाबतही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. बालवयापासून आरोग्यदायी आहाराच्या सवयी लावल्यास मुलांच्या सर्वांगीण विकासाला मदत होते, असा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला. या कार्यक्रमास जिल्हा उपआयुक्त पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय डॉ. सखाराम खुणे, सहायक आयुक्त डॉ. प्रवीणकुमार घुले, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अविनाश बुन्नावार, डॉ. दीक्षाली मोरे, डॉ. उमेश सोनटक्के तसेच पशुधन पर्यवेक्षक केदार देशमुख, रविकुमार बबिलवाड आणि विजय विभूते उपस्थित होते. पशुसंवर्धन विभागाच्या वतीने पशुधन विकास, दुग्धव्यवसाय आणि कुक्कुटपालनाला प्रोत्साहन देण्यासोबतच दूध व अंडी यांसारख्या अन्नपदार्थांचे पोषणातील महत्त्व जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी विविध उपक्रम राबविले जातात. त्याचाच एक भाग म्हणून सोमठाणा येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.