राँगसाईड sakal
छत्रपती संभाजीनगर

बेशिस्त वाहतुकीला राँगसाईडचाही ताप!

राँगसाईड वाहनधारकांचा वाढला वावर, अपघात अन् बेशिस्तीला निमंत्रण, व्यापक, जरब बसवणाऱ्या कारवाईची गरज

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : शहरात राँगसाईडची संस्कृती वाढत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. जालना रस्त्यावर वाहतूक व्यवस्था सुरळीत होण्यासाठी वाहतूक शाखेने आकाशवाणी आणि अमरप्रित सिग्नल बंद केल्याने वाहतूक सुरळीत होण्यास मदत झाली. मात्र, दुसरीकडे रॉंग वाहनांचा ताप वाढला आहे. कमी अधिक प्रमाणात सर्वच रस्त्यांवर रॉंगसाईड वाहन चालवणाऱ्यांची संख्या वाढल्याने व्यापक कारवाईची गरज निर्माण झाली आहे.

शहरात वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक शाखा प्रचंड मेहनत घेत आहे. वारंवार वाहतूक व्यवस्थेत नवनविन बदल करत आहेत. त्यामुळे वाहतूक व्यवस्था सुरळीत होण्यास मदत होत असतानाच वाहतूक नियमांचा भंग करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. जालना रोडवर सातत्याने वाहतूक कोंडीचा अनुभव येत होता, त्यामुळेच वाहतूक पोलिसांनी आकाशवाणी आणि अमरप्रित हे दोन सिग्नल बंद करुन वाहतूक सरळ सुरु ठेवण्याचा प्रयोग केला. या प्रयोगाने वाहतूक व्यवस्था सुरळीत झाली आहे. मात्र यामुळे वाहनधारकांना दुरवरुन वळून यावे लागत आहे. त्यामुळेच वाहनधारक सरळ रॉंगसाईड वाहने चालवत आहेत. विशेष म्हणजे वाहनधारक रॉंगसाईड वाहन चालवणाऱ्याला आपण रॉंगासाईड जात आहोत, किमान वाहन हळू चालवावे याचेही भान नसते. आपल्या सरळ जाणाऱ्या मार्गात केंव्हा रॉंगसाईड वाहन अंगावर येईल याचा नेम राहिला नाही.

अशी आहे काहीशी परिस्थिती

  • जालना रस्त्यावर क्रांतीचौक ते सिडको चौक आणि सिडको चौक ते क्रांतीचौक अशा दोन्ही मार्गावर सर्रास वाहने रॉंगसाईड.

  • समतानगर कडून आल्यानंतर क्रांतीचौकाकडे जाताना सर्रास वाहने रॉंगसाईड चालवले जात आहेत.

  • अदालत रोडवर म्हणजे न्यायालयाच्या सिग्नलपासून क्रांतीचौकाच्या दिशेने सर्रास वाहने रॉंगसाईड चालवली जात आहेत.

  • टीव्ही सेंटर चौकातून एन-१२ च्या दिशेने जाताना सलिम अली सरोवराच्या रस्त्यावर वाहने रॉंगसाईड चालवली जातात.

  • काला दरवाजाकडून येणारे वाहनधारक जिल्हाधिकारी यांच्या निवासापर्यंत रॉंगसाईडचा आधार घेतात.

  • जळगाव रस्त्यावर बजरंग चौकाकडून नारेगावकडे जाणारे वाहनधारक देवगिरी बॅंकेच्या चौकातून वोखार्ड चौकापर्यत रॉंगसाईड.

  • कॅनॉट प्लेसमधून जालना रस्त्यावर रामगिरी चौकातून आलेले नागरीक हायकोर्ट चौकापर्यंत रॉंगसाईडचा आधार घेतात.

  • गणेश कॉलनीतील शासकीय क्वार्टर परिसरातून आलेले वाहनधारक गुलशन महल पर्यत सर्रास उलट्या दिशेने .

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Strike: 11 सप्टेंबरला सार्वजनिक सुट्टी नाही तरी बँका बंद! सलग 4 दिवस बँका बंद राहणार? पाहा काय सुरू राहणार

Eknath Shinde: ठाकरे गटानंतर शिंदेसेनेला धक्का, बालेकिल्ल्यातील नगरसेवकाचे पद रद्द

iPhone 18 India Price: भारत ठरला iPhone 18 खरेदीसाठी जगातील दुसरा सर्वात महागडा देश! अमेरिकेपेक्षा तब्बल 50,000 रुपये जास्त!

US Open 2026: पहाटे ३.३३ वाजेपर्यंत रंगला थरार; ४ तास २८ मिनिटांच्या लढतीनंतर शेल्टनने गतविजेत्या अल्काराझला दिला धक्का

Marathi News Live Updates : पालिकेचा विरोध डावलून कॉरिडॉर होणारच; पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या पोस्टने पंढरपुरात राजकीय वातावरण तापले

SCROLL FOR NEXT