यशवंत महाविद्यालयाच्या वसतिगृहात इंडक्शन कार्यक्रम
नांदेड, ता. १८ : श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचालित यशवंत महाविद्यालयाच्या मुलांच्या वसतिगृहात शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या इंडक्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात निवासी विद्यार्थ्यांना वसतिगृहातील सुविधा आणि अभ्यासाबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
महाविद्यालयाच्या सुसज्ज नवीन इमारतीत २१५ विद्यार्थ्यांच्या निवासाची व्यवस्था आहे. येथे उत्तम भोजनाची कॅन्टीन, प्रत्येक मजल्यावर स्वतंत्र अभ्यासिका, सौरऊर्जा गरम पाणी, शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी ‘आरओ’ यंत्रणा आणि कडक सुरक्षा व्यवस्था उपलब्ध आहे.
प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन. शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यक्रमास वसतिगृह समन्वयक डॉ. संभाजी वर्ताळे, प्रमुख अतिथी डॉ. प्रशांत उबाळे, पालक प्रतिनिधी प्रा. पवणे, सहसमन्वयक प्रा. नारायण गव्हाणे आणि वॉर्डन भुजंग चव्हाण उपस्थित होते. प्रारंभी माजी केंद्रीय गृहमंत्री डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले.
डॉ. प्रशांत उबाळे यांनी डॉ. शंकररावांच्या कार्याचा इतिहास मांडला. प्रा. पवणे यांनी वसतिगृहातील सुविधांचा लाभ घेऊन आई-वडिलांची स्वप्ने पूर्ण करण्याचे आवाहन केले. प्रा. नारायण गव्हाणे यांनी अडचणी वेळोवेळी व्यवस्थापनाच्या निदर्शनास आणून देण्यास सांगितले. अध्यक्षीय समारोपात डॉ. संभाजी वर्ताळे यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रगतीबाबत बहुमूल्य मार्गदर्शन केले.
सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन भुजंग चव्हाण यांनी केले. उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. अजय गव्हाणे, प्रबंधक संदीप पाटील आणि अधीक्षक गजानन पाटील यांनी सहकार्य केले. कार्यक्रमास विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.