छत्रपती संभाजीनगर

यशवंतराव चव्हाण विचार मंचचे पुरस्कार जाहीर

CD
यशवंतराव चव्हाण विचार मंचचे पुरस्कार जाहीर --- नांदेड, ता. १२ : यशवंतराव चव्हाण विचार मंच, नांदेड (रोहिपिंपळगाव) यांच्या वतीने दिले जाणारे पुरस्कार जाहीर केले. यामध्ये पत्रकार आनंद कल्याणकर यांना ‘स्वातंत्र्यसैनिक एकनाथराव पाटील समाजभूषण पुरस्कार’, कृषिपुत्र गोपाळ पाटील इजळीकर यांना ‘ह.भ.प. संभाजीराव पाटील ग्रामविकास पुरस्कार’ जाहीर झाला आहे. लेखक प्र.श्री. जाधव यांना ‘प्रा. प्र.भा. काळे (उमरखेड) साहित्य गौरव पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे. आपल्या तीन मुलांच्या शिक्षणासाठी दिलेले योगदान तसेच पती गोविंदराव मेथे यांना दिलेली साथ यामुळे कुटुंबासाठी आदर्श निर्माण करणाऱ्या कल्पनाताई गोविंदराव मेथे यांना ‘कै. लताबाई नारायणराव शिंदे आदर्श गृहदेवता पुरस्कार’, त्यांच्या तीन मुलांपैकी एक मुलगा डॉक्टर, दुसरा प्राध्यापक तर तिसरा इंजिनिअर झाला असून, त्यांच्या जडणघडणीत कल्पनाताई मेथे यांचे मोठे योगदान आहे. या पुरस्कारांचे स्वरूप स्मृतिचिन्ह, ग्रंथ, शाल व पुष्पहार असे आहे. पुरस्कारांची निवड वेणूकार कवी प्रा. नारायण शिंदे, लेखक प्रा. व्यंकटी पावडे, डॉ. गोविंद भाकरे, प्रा. अनमोलसिंघ कामठेकर, शिवाजी देशमुख, डॉ. भारत कचरे, प्रा. सटवा शिंदे, प्रा. गोविंद गव्हाणे, रामेश्वर शिंदे यांनी केली. हे पुरस्कार आगामी काळात सन्मानपूर्वक समारंभात प्रदान करण्यात येतील, अशी माहिती मंचचे अध्यक्ष नारायण शिंदे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: ''माझा भाऊ...'' मनोज जरांगेंच्या मुंबई आंदोलनावर अमृता फडणवीसांची प्रतिक्रिया

Ganesh Aarti: यंदा गणपतीच्या आरतीसाठी पुस्तक शोधण्याची गरज नाही; सगळ्या आरत्या मिळवा एकाच ठिकाणी, एका क्लिकवर!

National Unity Day : गुजरातमध्ये पार पडणार राष्ट्रीय एकता दिन ; संजीवनीचे बॅण्ड पथक देणार पंतप्रधान मोदींना सलामी

Savings: 10 रुपयांची बचत करून पती-पत्नी वर्षभरात करतील 1 लाखांचा फंड! ना SIP, ना शेअर मार्केट; काय आहे हे चॅलेंज?

Marathi News Live Updates: ...तर आम्ही रस्त्यावर उतरु- बबनराव तायवाडे

SCROLL FOR NEXT