छत्रपती संभाजीनगर

दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण; शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे!

CD
ABD26J82285 येहळेगाव सोळंके ः परिसरातील विहिरींचा पाणीसाठी असा तळाला गेलेला आहे. --------- ‘आता बरस रे बाबा...!’ -- ढगाळ वातावरणामुळे शेतकरी पावसाच्या प्रतीक्षा ------------------ येहळेगाव सोळंके, ता. २९ : परिसरात गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले असून, पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या आहेत. ‘आता बरस रे बाबा...!’ अशी आर्त हाक शेतकऱ्यांकडून वरुणराजाला दिली जात आहे. खरीप हंगामातील सोयाबीनची काढणी पूर्ण होत असताना आता रब्बी हंगामातील पेरण्यांची लगबग सुरू होणे अपेक्षित होते. मात्र, पावसाने पाठ फिरवल्याने जमिनीतील ओलावा कमी झाला असून, रब्बी पेरण्यांचा प्रश्न गंभीर बनला आहे. यंदा पावसाने सुरवातीपासूनच शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे. खरीप हंगामातील पिकांच्या काढणीनंतर रब्बी हंगामातून काहीतरी उत्पन्न मिळेल, अशी आशा शेतकऱ्यांना आहे. मात्र, विहिरी आणि बोअरवेलच्या पाणीपातळीत घट झाल्याने सिंचनाचा प्रश्नही निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत रब्बी पिकांची पेरणी कशी करायची, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे. गेल्या दोन दिवसांपासून आकाशात ढगांची गर्दी दिसत असली, तरी अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे पावसाच्या आशेवर असलेल्या शेतकऱ्यांची प्रतीक्षा कायम आहे. जमिनीत पुरेसा ओलावा नसल्याने पेरणी केल्यानंतर बियाणे उगवेल की नाही, याचीही शेतकऱ्यांना चिंता सतावत आहे. परिणामी, रब्बी हंगामातील पेरण्यांना विलंब होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. - दिवाळीचा खर्च अन् शेतीची चिंता एकीकडे पावसाअभावी रब्बी पेरण्यांचे नियोजन कोलमडले आहे, तर दुसरीकडे ऐन दिवाळीच्या काळात शेतकऱ्यांसमोर आर्थिक अडचणी उभ्या आहेत. खरीप पिकातून अपेक्षित उत्पन्न मिळवताना आलेल्या अडचणी, दुकानदारांची उधारी, शेतीसाठी लागणारा खर्च आणि कुटुंबाच्या गरजा भागविण्याची कसरत शेतकऱ्यांना करावी लागत आहे. अशा परिस्थितीत रब्बी हंगामही पावसाअभावी अडचणीत सापडल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. -- पावसाशिवाय पेरणी नाही ढगाळ वातावरणामुळे पाऊस पडेल, अशी आशा शेतकऱ्यांना वाटत आहे. मात्र, केवळ ढगाळ वातावरण पुरेसे नसून प्रत्यक्ष पाऊस झाल्याशिवाय पेरणीला गती मिळणे कठीण आहे. त्यामुळे आता वरुणराजा कधी बरसणार आणि रब्बी पेरण्यांना कधी सुरवात होणार, याकडे येहळेगाव सोळंकेसह परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Chairman Election : 'गोकुळ'च्या अध्यक्षपदी चुयेकर, समांतर सभेत मोठी घोषणा; सतेज पाटलांचा मास्टरस्ट्रोक, आता महायुतीच्या भूमिकेकडे लक्ष

SIP Investment: फक्त 3,500 रुपयांच्या SIP मधून 3 कोटींचा फंड! करोडपती बनण्याचा फॉर्म्युला कसा काम करतो? गणित पाहा!

School Books: सरकार बदललं अन् शालेय पाठ्यपुस्तकातील 'हे' शब्दही बदलले; पश्चिम बंगालमध्ये मुघल इतिहासाला कात्री

Meenakshi Shinde Resign: माझ्या मनाला प्रचंड वेदना होतायत..., मीनाक्षी शिंदेंनी राजीनाम्याच्या पत्रात नेमकं काय लिहलंय?

WPL AUCTION 2027: वय फक्त १५ वर्षे, WPL ऑक्शनमध्ये इतिहास! दिल्ली कॅपिटल्सने उमा काशवीला निवडलं, कोण आहे ही युवा अष्टपैलू खेळाडू?

SCROLL FOR NEXT