बाष्पीभवनाने ‘येलदरी’च्या
पातळीत दिवसेंदिवस घट
------
धरणारत ५९.६४ टक्के उपयुक्त साठा
----
जिंतूर, ता. २६ (बातमीदार) ः यंदा पावसाचा दीर्घ खंड, त्यातच सद्यःस्थितीत वाढत्या तापमानामुळे वाढलेल्या बाष्पीभवनामुळे तालुक्यातील येलदरी धरणाच्या पातळी दिवसेंदिवस घट होत आहे. सोमवारी (ता. २६) सकाळी धरणात ५९.६४ टक्के उपयुक्त साठा होता.
यंदा पावसाळ्यात सुरवातीपासूनच धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण खूप कमी राहिले. जुलै महिन्याच्या शेवटी धरणात ५० टक्के उपयुक्त साठा उपलब्ध होता. परंतु, पाऊस समाधानकारक नसल्याने सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस जलसाठ्यात केवळ दहा ते साडेदहा टक्के वाढ झाली होती. तीदेखील रोज खालावत असल्याने सोमवारी सकाळी ५९.६४ टक्क्यांपर्यंत खाली आली. शिवाय उन्हाच्या सततच्या तीव्रतेने होत असलेल्या बाष्पीभवनामुळे पातळी खालावत आहे. धरणातील एकूण साठा क्षमता ९३४.४४० दशलक्ष घनमीटर असून, जिवंत साठ्याची क्षमता ८०९.७७० दशलक्ष घनमीटर आहे. पैकी सोमवारी सकाळपर्यंत एकूण उपलब्ध साठा ६०७.५८४ दशलक्ष घनमीटर असून ४८२.९१३ दशलक्ष घनमीटर जिवंत साठा उपलब्ध आहे, ज्याची टक्केवारी ५९.६४ एवढी असल्याची माहिती संबंधित उपविभागीय कार्यालयाची आहे.
--------
पाणीटंचाईचे संकट गडद
गतवर्षी याच दिवशी धरण १०० टक्के भरले होते. त्यामुळे वीजनिर्मितीसह काही गेटद्वारे पाण्याचा मोठा विसर्ग नदीपात्रात सोडला होता. याउलट सध्या धरणासमोरील नदीपात्र कोरडे पडलेले दिसत आहे. त्यामुळे धरणाच्या लाभक्षेत्रातील रब्बी हंगामासह उन्हाळी पिकांसाठी तसेच धरणाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या जिंतूर तालुक्यासह परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील अनेक गावांच्या पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची शक्यता आहे. ग्रामीण भागातील नदीनाले कोरडेठाक पडल्याने जलसंकटात भर पडण्याची भीती आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.