छत्रपती संभाजीनगर

पैठण तालुक्यात तरुण व्यावसायिकाची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

ज्ञानेश्‍वर बोरुडे

लोहगाव (जि.औरंगाबाद) : पैठण (Paithan) तालुक्यातील तारूपिंपळवाडी येथून चार दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या तरुण सलून व्यावसायिकाने विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना (Crime In Aurangabad) उघडकीस आली आहे. कृष्णा विष्णू वाघमारे असे मृत तरुणाचे नाव असून विहीरीजवळ चप्पलखाली सुसाईड नोट सापडल्याच्या चर्चेला परिसरात उधाण आले आहे. याबाबत मिळालेली माहिती, अशी की तारूपिंपळवाडी येथील सलून व्यावसायिक कृष्णा वाघमारे हा शुक्रवारी (ता.३०) मध्यरात्री कोणाला काहीच न सांगता बेपत्ता झाला होता. सकाळी कुटुंबिय उठले असता तो दिसून आला नाही. घरच्यांनी सोशल मीडियावर (Social Media) त्याचा फोटो टाकून कुणाला काही एक न सांगता घरातून निघून गेला कोणाला आढळल्यास माहिती देण्याची आवाहन केले होते. नातेवाईक इतर ठिकाणी शोध मोहीम सुरू असताना सोमवार (ता.दोन) दुपारी गावाजवळील शेतावर शेतकरी चक्कर मारून विहीरीवर आला असता बाजूला चप्पला दिसून आल्याने विहीरीत डोकावून पाहिल्यावर पाण्यात तरंगलेले मृतदेह दिसून आले.

या घटनेची खबर पैठण औद्योगिक वसाहत पोलिस ठाण्यात दिली. पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढून पंचनामा केला. पैठण ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदनानंतर रात्री उशिरा मृत तरूणावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणी पैठण औद्योगिक वसाहत पोलिस ठाण्यात (एमआयडीसी) आकस्मिक मृत्यूचा गुन्हा दाखल करून पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार शरद पवार, दिनेश दाभाडे करित आहेत. दरम्यान विहिरीजवळील चप्पलाखाली एक हस्तलिखित चिठ्ठी सापडली असल्याची चर्चेला उधाण आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NCP च्या महिला प्रदेशाध्यक्षपदासाठी ५ नावांची चर्चा; कोणाच्या हाती जाणार संघटनेची कमान? सुनेत्रा पवारांसमोर मोठं आव्हान

भाजपला मोठा धक्का, ३ माजी आमदारासह ६ नेत्यांचा काँग्रेस प्रवेश

RCB vs SRH Live : हैदराबादच्या खेळात 'सॉल्ट'! तीन अविश्वसनीय कॅच, इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले, अनिकेत वर्माने झोडले

Pali News : मुंबई गोवा महामार्गाच्या खड्ड्यात चक्क मगरींचा मुक्काम! कामगारांची समयसूचकता अन मगरींना मिळालं नवजीवन

RCB vs SRH Live : पहिल्याच सामन्यात वाद... हेनरिच क्लासन अम्पायरच्या निर्णयावर नाराज... काव्या मारनही भडकली, सॉल्टच्या कॅचवर शंका?

SCROLL FOR NEXT