शेतकरी बाळकृष्णा भगवान चौधरी  
छत्रपती संभाजीनगर

उत्पन्न मिळणार नाही या विवंचनेतून तरुण शेतकऱ्याने घेतला गळफास

ईश्वर इंगळे

सोयगाव (जि.औरंगाबाद) : खरिपाची विदारक स्थिती आणि पावसाने फिरविलेली पाठ यामुळे करपलेला हंगाम पाहून नैराश्य आलेल्या कर्जबाजारी शेतकऱ्याने (Farmer Suicide) दोरीने गळफास घेऊन जीवन संपविल्याची घटना बुधवारी (ता.१८) जरंडी (ता.सोयगाव) (Soygaon) शिवारात घडली. या प्रकरणी महसूल (Aurangabad) प्रशासनाने नोंद घेतली असून सोयगाव पोलिस ठाण्यात शेतकरी आत्महत्येची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जरंडी शिवारातील अल्पभूधारक शेतकरी बाळकृष्णा भगवान चौधरी (वय ३८) यांची जरंडी शिवारात गट क्रमांक २९३ मध्ये शेती आहे. त्यांनी ठिबक सिंचनावर कपाशीची लागवड केली होती. परंतु पावसाने पाठ फिरविल्याने कपाशी पिकाची स्थिती नाजूक झाली आहे.

यामुळे उत्पन्न हाती येणार नाही, असे मनाशी ग्रह करून कर्ज फेडण्याच्या विवंचनेमुळे शेतातच झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची सोयगाव पोलिस ठाण्यात शेतकरी आत्महत्येची नोंद करण्यात आली असून घटनेचा पंचनामा जमादार संतोष पाईकराव, रवींद्र तायडे, शिवदास गोपाल आदींनी केला आहे. बाळकृष्णा यांच्या पश्चात आई, भाऊ, पत्नी आणि एक मुलगी असा परिवार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amravati NICU Deaths : अमरावती हादरलं! जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात अतिदक्षता कक्षाला भीषण आग, ३ बालकांचा गुदमरून मृत्यू

मोठी बातमी! बाजार समिती कांदा लिलावासाठी खरेदी करणार बोरामणी हद्दीत ४० एकर जमीन; संचालक मंडळांची मंजुरी, आता पणन संचालकांच्या मान्यतेची प्रतीक्षा

बोगस शालार्थ आयडी! ‘एसआयटी’ने पुन्हा मागितली ३ महिन्यांची मुदतवाढ; ३ लाख कर्मचाऱ्यांच्या पडताळणीस लागतोय वेळ; थर्ड पार्टी तक्रारींवरही आता कार्यवाही

24 ऑगस्ट 2026 पंचांग! श्रावणी सोमवारला आज कोणते शुभ मुहूर्त? जाणून घ्या

आजचे राशिभविष्य - २४ ऑगस्ट २०२६

SCROLL FOR NEXT