Aurangabad  sakal
छत्रपती संभाजीनगर

Aurangabad : पिकांना पाणी देताना विजेचा धक्का लागून तरुणाचा मृत्यू

पाचोडजवळील थेरगाव येथील घटना : पाचोड पोलिस ठाण्यात नोंद

सकाळ वृत्तसेवा

पाचोड : पिकांना पाणी देण्यासाठी गेलेल्या तरुणाचा विजेच्या धक्क्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना थेरगाव (ता.पैठण) येथे सोमवारी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास घडली. गणेश भाऊसाहेब जाधव (वय १९, रा.थेरगाव ता.पैठण) असे मृत तरुणाचे नाव आहे. सदर तरुण विजेचे भारनियमन असल्याने रात्रीला शेतातील पिकास पाणी देण्यासाठी गेला होता.

यावेळी विजेचा धक्का लागून त्याचा मृत्यू झाला. सकाळी चहा नाश्त्याची वेळ झाली तरी गणेश येत नाही म्हणून त्याचे वडील भाऊसाहेब जाधव हे शेतात गेले. यावेळी त्यांना गणेशच्या अंगावर वायर पडून तो विजेचा शॉक लागून मृत झाल्याचे दिसून आले. त्यांनी कुटुंबीयांना सांगितले. तोच सर्व कुटुंबीय, ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली.

यानंतर महावितरणच्या दावरवाडी उपकेंद्रास माहिती देऊन बंद करून वायरमन सोमनाथ औटी व इतरांनी घटनास्थळी भेट दिली. गणेश यास पाचोडच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मृतदेहाच्या पंचनाम्यानंतर मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आली. नंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.

सायंकाळी या तरुणावर थेरगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. मृत तरुणाच्या पश्चात आई, वडील, एक भाऊ असा परिवार आहे. याप्रकरणी पाचोड ठाण्यात नोंद करण्यात आली. तपास पाचोड ठाण्याचे सपोनि. गणेश सुरवसे व सहकारी करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाणे हादरलं! ठाकरे गटाच्या नेत्यावर झाडल्या गोळ्या, उपचारावेळी मृत्यू

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Exam Fee : दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Motorcycle Accident : मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार :एक जखमी

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

SCROLL FOR NEXT