Sambhaji Nagar Crime sakal
छत्रपती संभाजीनगर

Sambhaji Nagar Crime : लूटमार करणाऱ्या तरुणीला अटक;पालिका अधिकाऱ्याला मारहाण करीत लांबविला होता ऐवज

नगर परिषदेतील शहर समन्वयकाला रस्त्यात अडवून लूटमार करणाऱ्या तरुणीसह तिच्या तीन साथीदारांना सिडको पोलिसांनी गजाआड केले. ३१ मे रोजी रात्री साडेअकरा वाजता जळगाव रोडवरील एसबीओए शाळेजवळ हा प्रकार घडला होता.

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : नगर परिषदेतील शहर समन्वयकाला रस्त्यात अडवून लूटमार करणाऱ्या तरुणीसह तिच्या तीन साथीदारांना सिडको पोलिसांनी गजाआड केले. ३१ मे रोजी रात्री साडेअकरा वाजता जळगाव रोडवरील एसबीओए शाळेजवळ हा प्रकार घडला होता. आकाश ऊर्फ आक्या राजेंद्र बनकर (वय २३, रा. आंबेडकरनगर), रवी राजू जाधव (वय २०, रा. मुकुंदवाडी गाव), रोहित ऊर्फ थॅरो रवी जाधव (वय २३, रा. संजयनगर, मुकुंदवाडी) आणि उज्ज्वला जॉली किशोर रगडे (वय ३२, रा. आंबेडकरनगर) अशी आरोपींची नावे आहेत.

प्रकरणात एन-११ नवजीवन कॉलनीत राहणारे राहुल प्रल्हाद चव्हाण (वय ३०) यांनी फिर्याद दिली. यामध्ये चव्हाण हे अहमदपूर (जि. लातूर) नगर परिषदेत शहर समन्वयक म्हणून नोकरी करतात. ३१ मे रोजी सायंकाळी कामानिमित्त चव्हाण अहमदपूरहून परळी (जि. बीड) येथे आले. सायंकाळी ते परळीतून वरिष्ठांच्या कारने निघाले व मुकुंदवाडीतील धूत हॉस्पिटलसमोर उतरले. रात्री ११ः३० च्या सुमारास ते रिक्षाने एसबीओए शाळेजवळ उतरले. तेथून ते घराकडे पायी निघाले असता, दोन तरुणांनी त्यांचा रस्ता अडवला व तुझ्याजवळील मोबाइल आणि पैसे आम्हाला देऊन टाक असे म्हणाले. त्यावर फिर्यादीने नकार दिला असता आरोपींनी झटापट सुरू केली.

फिर्यादी प्रतिकार करत असल्याचे पाहून आरोपींनी आपल्या साथीदारांना फोन करून बोलावले. त्यावेळी एका दुचाकीवर एक तरुण व महिला तेथे आली. त्यानंतर चौघांनी फिर्यादीला मारहाण करून त्यांच्याजवळील ८५०० रुपये बळजबरी काढून घेत एका दुचाकीवर चौघांनी पळ काढला. प्रकरणात सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सिडको पोलिस निरीक्षक अतुल येरमे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय प्रमोद देवकाते, सुभाष शेवाळे, लालखा पठाण, प्रदीप दंडवते, सहदेव साबळे, मंगेश पवार, विशाल सोनवणे यांनी आरोपींचा शोध घेत त्यांना अटक केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT