youth adv sharad naiknavare did dragon fruit farming make revenue of 4 lakh agriculture Sakal
छत्रपती संभाजीनगर

Dragon Fruit Farming : ‘वकील’ शेतकरी रमलाय ‘ड्रॅगन फ्रूट’ शेतीत

युवा शेतकरी अॅड. शरद नाईकनवरे यांनी केलेल्या दीड एकर ड्रॅगन फ्रूटच्या शेतीतून साडेचार लाखांचे उत्पन्न मिळाले

कमलेश जाब्रस

माजलगाव : कधी पावसाअभावी तर कधी पावसामुळे, वातावरणातील बदलांमुळे, निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती व्यवसाय आतबट्ट्याचा ठरत असला तरी ड्रॅगन फ्रूट लागवडीतून किफायतशीर, फायदेशीर शेती तालुका परिसरातील शेतकरी करत आहेत. पौष्टिकदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या माजलगावच्या ड्रॅगन फ्रूटला मुंबई, पुण्यातून मोठी मागणी आहे.

येथील युवा शेतकरी अॅड. शरद नाईकनवरे यांनी केलेल्या दीड एकर ड्रॅगन फ्रूटच्या शेतीतून साडेचार लाखांचे उत्पन्न मिळाले. आणखी दीड लाखाचे उत्पन्न त्यांना अपेक्षित आहे. तालुका परिसरामध्ये पाण्याची मोठी मुबलकता असल्यामुळे येथील शेतकरी ऊस, कापूस, सोयाबीन आदी पिकांकडे वळले आहेत. अत्यल्प पावसामुळे मात्र शेतकरी हवालदिल झाला आहे.

उच्च विद्याविभूषित असणारे युवा शेतकरी फळबाग लागवडीवर भर देत आहेत. परिसरामधील युवा शेतकऱ्यांनी डाळिंब, मोसंबी, चिक्कू, पपई, केळी, केशर आंबा, पेरू, टरबूज, खरबूज आदींची यशस्वी लागवड करत मोठ्या प्रमाणावर आर्थिक सुबत्ता मिळविली आहे. आता ड्रॅगन फ्रूटची शेतीही यशस्वी ठरत आहे.

अशी केली लागवड

शेतकरी अॅड. शरद किशनराव नाईकनवरे यांनी चार जातीच्या ड्रॅगन फ्रूटची फेब्रुवारी २०२२ मध्ये १२ बाय ७ अंतरावर लागवड केली होती. वेळोवेळी मशागत, फवारणी केली. सध्या ड्रॅगन फ्रूट उत्पादन मिळू लागले असून दीड एकरात त्यांना साडेचार लाखांचे उत्पन्न मिळाले आहे.

भारतात मागणीच्या तुलनेत वीस टक्के उत्पादन होते. ८० टक्के आयात करावा लागते. उन्हाळ्यातही अत्यल्प पाण्यावर हे पीक येते. मार्च, एप्रिल, मे महिन्यात सहा वेळेस पाणी दिले तरीही पीक येते, असे ते सांगतात.

‘ड्रॅगन फ्रूट’विषयी...

  • वर्षातील हंगाम- आठ

  • बाजारपेठ - सोलापूर, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, पुणे, मुंबई, अहमदनगर, हैदराबाद

  • पाण्याचे नियोजन - अत्यल्प, ठिबकद्वारे शक्य

  • एकूण एकरी खर्च - दीड लाख

  • एकूण एकरी उत्पन्न - सहा लाख

  • एकरी- ५१८ पोल/दोन हजार शंभर रोपे

  • फळ लागण्याचा कालावधी - दीड वर्ष

  • आयुष्य - २० ते २५ वर्षे

  • उगम- मेक्सिको, अमेरिका

  • मोठा निर्यातदार देश- व्हिएतनाम

  • रेड व्हाइट- शुगर असलेल्यांना फायदेशीर

  • जम्बो रेड, सी- सर्वांसाठी फायदेशीर

निपाणी टाकळी येथील शेतात वीस महिन्यांपूर्वी दीड एकरमध्ये तीन जातीच्या ड्रॅगन फ्रूटची लागवड केली. जून २०२३ मध्ये अडीच एकरवर सी प्रकाराची लागवड केली आहे. आता आठ एकरमध्ये लागवड सुरू आहे. तरुण शेतकऱ्यांनी पारंपारिक पिकांच्या लागवडीसोबतच पाण्याची उपलब्धता, निचऱ्याच्या जमिनीत ड्रॅगन फ्रूटची लागवड करावी.

- अॅड. शरद नाईकनवरे, शेतकरी, माजलगाव.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Statue of Liberty: काही सेकंदात भीषण दुर्घटना… स्टॅच्यू ऑफ लिबर्टी अचानक कोसळली, थरारक VIDEO व्हायरल

Buldhana Accident: मंगरूळ नवघरे येथे काळी पिवळी आणि दुचाकीची भीषण धडक; ३५ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू

Breaking: लागा तयारीला... BCCI ने जाहीर केली IPL 2026 च्या तारखा; फ्रँचायझींना ई-मेल अन्...

Kolhapur Young Footballers Meet Messi : वानखेडेवर ‘लय भारी’ क्षण; मेस्सीने खेळवले, टिप्स दिल्या आणि कोल्हापूरकरांचा अभिमान वाढवला

Municipal Corporation Election : पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये स्वबळाचा नारा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

SCROLL FOR NEXT