छत्रपती संभाजीनगर

लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी युवकांचा सक्रिय सहभाग आवश्यक

CD
ABD26J82816 हिंगोली : कार्यक्रमात मार्गदर्शन करताना खासदार रामराव वडकुते. --------------------- ‘लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी युवकांचा सक्रिय सहभाग आवश्यक’ ----- हिंगोली, ता. ६ : लोकशाही व्यवस्थेत प्रत्येक मताला अनन्यसाधारण महत्त्व आहे. युवकांनी मतदान प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवून जागरूक आणि जबाबदार नागरिक म्हणून आपली भूमिका पार पाडावी. युवकांचा सजग सहभाग हाच लोकशाही बळकट करण्याचा आणि विकसित भारताच्या निर्मितीचा भक्कम आधार आहे, असे प्रतिपादन खासदार रामराव वडकुते यांनी केले. भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयांतर्गत कार्यरत माय भारत केंद्राच्या वतीने भारतरत्न नानाजी देशमुख आयटीआय महाविद्यालयात शुक्रवारी (ता. सहा) ‘विकसित भारत युवा संवाद- आपले मत जाणून घ्या’ हा जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमास माय भारत केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी प्रणित सांगवीकर, राष्ट्रीय युवा पुरस्कार विजेते पुष्यमित्र जोशी, प्राचार्य रवि बोथीकर उपस्थित होते. खासदार वडकुते म्हणाले, कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता विचारपूर्वक मतदान करणे आवश्यक आहे. देशाच्या विकासात युवकांचे योगदान महत्त्वपूर्ण असून जबाबदार आणि कर्तव्यदक्ष युवा पिढीच विकसित भारताचे स्वप्न साकार करू शकते, असेही त्यांनी अधोरेखित केले. जिल्हा युवा अधिकारी प्रणित सांगवीकर यांनी प्रास्ताविक केले. प्रवीण पांडे यांनी सूत्रसंचालन केले. --------------- युवकांनी घेतली शपथ कार्यक्रमात युवकांना लोकशाही शपथ देण्यात आली. युवा संवाद सत्रात विद्यार्थ्यांनी लोकशाही, मतदान, युवकांचे अधिकार, सामाजिक जबाबदारी आणि देशाच्या विकासातील युवकांचे योगदान या विषयांवर उत्स्फूर्तपणे विचार मांडले. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना मान्यवरांनी मार्गदर्शनातून उत्तरे दिली. यावेळी मतदार नोंदणी व मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रियेची माहिती देण्यात आली. पात्र युवकांनी मतदार म्हणून नोंदणी करावी तसेच मतदार यादीतील आपल्या नावाची खात्री करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ACB Action: मोफत कायदेशीर मदतीच्या नावाखाली लाचखोरी! वकील ताब्यात, पत्नीविरोधातही गुन्हा; एसीबीने रंगेहाथ पकडलं

Maharashtra Village Diwali Bonus: महाराष्ट्रातील 'या' गावाची कमाल! गावकऱ्यांना दिला दिवाळी बोनस; विकासाच्या जोरावर देशभर डंका

Lavrov Deepfake: बनावट व्हिडिओमुळे प्रशांत भूषण अडचणीत; दिल्ली पोलिसांनी दाखल केली FIR

ना हिरो, ना खलनायक; महेश कोठारेंच्या 'माझा छकुला' मध्ये हमाल म्हणून दिसलेले सचिन गोस्वामी; कशी मिळालेली भूमिका? म्हणाले-

Pune Crime: पुण्यात व्यावसायिकावर गोळीबार करून २२ तोळ्यांचे सोने लुटले; उत्तर प्रदेशातील टोळीला मकोका

SCROLL FOR NEXT