छत्रपती संभाजीनगर

धरणग्रस्तांच्या प्रश्नावर युवा संघर्ष समितीची मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा

CD
धरणग्रस्तांच्या प्रश्नावर युवा संघर्ष समितीची मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा ----- माजलगाव, ता. १६ (बातमीदार) : माजलगाव धरणाची उंची वाढविण्याच्या निर्णयाला विरोध करणाऱ्या युवा संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन प्रकल्पग्रस्तांच्या समस्या मांडल्या. आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष डॉ. ओमप्रकाश शेटे यांच्या पुढाकारातून झालेल्या या भेटीत धरणग्रस्तांवर अन्याय होणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे शेटे यांनी सांगितले. धरणाच्या उंचीवाढीला २२ गावांचा विरोध असून, यापूर्वी १९८०-८५ दरम्यान ३० ते ३२ गावांचे पुनर्वसन झाले आहे. यातील अनेक शेतकरी भूमिहीन झाले असून, पुन्हा धरणाची उंची वाढल्यास माजलगाव, वडवणी व गेवराई तालुक्यातील सुपीक शेती पाण्याखाली जाण्याची भीती शिष्टमंडळाने व्यक्त केली. उंची वाढविण्याऐवजी धरणातील गाळ काढावा अथवा बॅरेजेस उभारण्याचा पर्याय स्वीकारावा, अशी मागणी शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांकडे केली. यावर फडणवीस यांनी एकाही शेतकरी किंवा प्रकल्पग्रस्तावर अन्याय होऊ देणार नसल्याचे सांगत राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव एकनाथ डवले यांना प्रकरणाचा वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याचे निर्देश दिल्याचे शेटे यांनी सांगितले. त्यानंतर शिष्टमंडळाने डवले यांची भेट घेऊन प्रशासकीय कार्यवाहीबाबत चर्चा केली. -----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPS बुशरा बानो कोण? इन्शाल्लाह म्हटल्यानं वाद, तक्रारीनंतर तडकाफडकी बदली

IPL 2027 Auction कुठे होणार? मागील काही वर्षांत दुबई, जेद्दाह, अबु धाबी येथे झाला होता लिलाव; यावर्षी...

UPI New Rule: UPI आता खरंच महागणार? ₹2,000 नंतर काय बदलणार; सामान्य माणसाला काय फटका, काय फायदा?

Asian Games 2026: माशी शिंकली! भारतीय संघाला मोठा धक्का, प्रमुख खेळाडूची माघार; IND vs AFG सामन्यात ४ षटकं फेकली अन्...

Marathi News Live Updates : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री शिंदेंच्या निवासस्थानी, गणपतीचं घेतलं दर्शन

SCROLL FOR NEXT