नवरात्रोत्सवात ‘झिरो ब्रेकडाऊन’
श्री तुळजाभवानीच्या भक्तांसाठी २४ तास अखंड वीजपुरवठ्याचे नियोजन
सकाळ वृत्तसेवा
धाराशिव, ता. ८ : श्री तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवासाठी (११ ते २६ ऑक्टोबर) तुळजापूर शहरात लाखो भाविकांची होणारी अलोट गर्दी लक्षात घेता, शहरात २४ तास अखंडित व सुरक्षित वीजपुरवठा देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. गर्दीच्या ठिकाणी वीज खंडित झाल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाच्या निर्देशानुसार महावितरण आणि स्थानिक यंत्रणा झिरो ब्रेकडाऊन धोरण राबविणार आहे.
शहरात २४ तास विशेष विद्युत नियंत्रण कक्ष कार्यरत राहणार आहे. आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी वरिष्ठ अधिकारी, तंत्रज्ञ आणि वायरमन शिफ्टनुसार २४ तास ऑन-ड्यूटी उपलब्ध असतील.
ओव्हरलोडिंग रोखण्यासाठी स्पेयर ट्रान्स्फॉर्मर्स
वीज यंत्रणेवर अतिरिक्त ताण येऊन ट्रान्सफॉर्मर जळू नयेत, यासाठी भारनियोजन केले जात आहे. ऐनवेळी तांत्रिक बिघाड झाल्यास तातडीने पर्याय उपलब्ध व्हावा म्हणून अतिरिक्त ट्रान्सफॉर्मर्स आणि फ्यूज सज्ज ठेवण्यात आले आहेत.
धोकादायक खांबावर कारवाई
भाविकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत शहरातील उघड्या केबल्स, उघडे जंक्शन बॉक्स आणि लटकणाऱ्या वायर्स तत्काळ दुरुस्त करण्यात येत आहेत. धोकादायक स्थितीतील विद्युत पोल व वायर्स बदलण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
महोत्सव सुरू होण्यापूर्वीच संपूर्ण तुळजापूर शहरात महावितरणमार्फत पूर्व-देखभाल मोहीम राबवली जात आहे. नगर परिषद आस्थापना, मंदिर परिसर आणि भाविकांच्या मुख्य मार्गांवरील वीजप्रवाह अखंड राहील, याची खात्री केली जात आहे.
........
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.